सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
*गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते मो. युसुफ पुंजानी यांचा सत्कार*
*कारंजा येथे लाखो भाविकांनी केले श्रीगुरु चरीत्राचे पारायण*
*परराज्यातील भाविकांचाही सहभाग ; त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ गुरुपीठाचे आयोजन*
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा (लाड) :* अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर द्वारे कारंजा येथील नागपूर - औरंगाबाद महामार्गावर पुंजानी ले - आऊट येथे दि. २१ फेब्रुवारी गुरूचरित्र पारायण सोहळा गुरुमाऊली प.पू.आण्णासाहेब मोरे यांच्या पावन सानिध्यात हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दरम्यान गुरूचरित्र पारायण सोहळ्याकरिता निःशुल्क जागा उपलब्ध करून देणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हाजी मो. युसुफ पुंजानी यांचा गुरुमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पुंजानी यांनी कारंजा शहराच्या वतीने गुरुमावली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सविस्तर असे की, अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने नृसिंह स्वामी सरस्वतींच्या जन्मभुमित व प.पु. गुरुमाऊलींच्या पावन सानिध्यात कारंजा येथे मंगळवार २१ फेब्रुवारीला २०२३ रोजी एकदिवसीय श्रीगुरू चरीत्र पारायण सोहळा व सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगात लाखो भाविकांनी श्रीगुरु चरीत्र पारायणाचे पठन व श्रवण केले. मंगळवार २१ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता श्रीगुरू चरीत्र पारायण पठणास सुरुवात झाली. यात परराज्यातील भाविकही सहभागी झाले होते. कारंजा शहरालगतच्या नागपूर औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील पुंजानी ले -आऊटवर पार पडलेल्या सत्संगात स्वामी समर्थ गुरुपीठाचे सर्वेसर्वा प. पु. गुरुमाऊली उर्फ अण्णासाहेब मोरे यांनी विविध विषयांचे दाखले देत उपस्थितांना मोलाचे असे मार्गदर्शन केले. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्रीगुरु चरीत्र असे म्हणत भाविक मोठ्या संख्येने या सत्संगात सहभागी झाले होते. कारंजा शहरातील नियोजीत स्थळी स्वामी समर्थ केंद्राचे जिल्हाप्रतिनिधी डॉ. रवी पाटील व सुनिल पाटील धाबेकर यांनी हा सत्संग योग्य रितीने व नियोजनबध्द पध्दतीत पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. या सत्संगात सहभागी होण्यासाठी सुनिल धाबेकर यांनी कारंजा तालुक्यातील जनतेला आवाहन केले होते. त्या आवाहनास सत्कारात्मक प्रतिसाद देत कारंजा तालुक्यासह वाशिम जिल्हा व परराज्यातील जवळपास २ लाख भाविक या सत्संगात सहभागी झाल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...