Home / विदर्भ / वाशिम / बोराळा येथील उपसरपंचाचे...

विदर्भ    |    वाशिम

बोराळा येथील उपसरपंचाचे सिनेस्टाईल अपहरण करून हत्या!! पोलीसांनी चौघांना केली अटक एक जण चौकशीसाठी ताब्यात

बोराळा येथील उपसरपंचाचे सिनेस्टाईल अपहरण करून हत्या!!    पोलीसांनी  चौघांना केली अटक  एक जण चौकशीसाठी ताब्यात

 

 

वाशिम : मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील उपसरपंच विश्वास श्रीपत कांबळे वय ६० वर्षे यांचे  तिन जणांनी चारचाकी वाहनातुन सिनेस्टाईल अपहरण करून हत्या  केल्याची घटना १८फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी जऊळका रेल्वे पोलीसांनी  बोराळा येथील चार जणांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध भादवी ३०२/३६४/१२०ब/३(२) VA /३(२) v नुसार गुन्हा दाखल केला आहे .तर एका जणास चौकशी साठी ताब्यात घेतले आहे.         मृतकाची पत्नी नामे लिलाबाई विश्वास कांबळे वय ५५वर्षे यांनी१९फेब्रुवारी रोजी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार मृतक विश्वास कांबळे हे बोराळा येथील उपसरपंच असुन त्यांचे गावातीलच काही  व्यक्तींनी पुर्व वैमनस्य व राजकीय वादातून चारचाकी वाहनातुन सिनेस्टाईल अपहरण करुन हत्या केल्याची फिर्याद  जऊळका रेल्वे पोलीसांत दिली आहे.  विश्वास कांबळे हे १८फेब्रुवारी रोजी पत्नी लिलाबाई सह दवाखाना व बाजाराचे कामा निमित्त  किन्हीराजा येथे गेले असता  दुपारी साडेतीन वाजता दरम्यान  तिन जणांनी एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात विश्वास कांबळे यांना बळजबरीने बसविले व सिनेस्टाईल अपहरण करुन त्यांना बेशुद्ध अवस्थेत गुंज गावा जवळ टाकून दिले . घटनेची माहिती मिळताच जऊळका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर गुंज फाट्यावर गंभीर अवस्थेत आढळून आलेल्या विश्वास कांबळे यांना  वाशिम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून विश्वास कांबळे यांना मृत घोषित केले.घटना स्थळा वरील परिस्थिती जन्य पुरावे व प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी  तपासाची चक्रे वेगाने फिरवुन या प्रकरणी १८फेब्रुवारीच्या रात्रीच बोराळा येथील चौघा जणांना अटक करून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.  तर एका जणाला १९फेब्रुवारी रोजी चौकशी साठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती जऊळका रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदिप राठोड यांनी दिली उपसरपंच विश्वास कांबळे यांचे राजकीय वाद व पुर्व वैमनस्यातून अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक  अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या बारा तासाच्या आतच चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.  तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश घुगे सुनील काळदाते पोलीस कॉन्स्टेबल दीपक कावरखे पवन राठोड रवी जवंजाळ आदींनी आरोपीं चा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रदीप कुमार राठोड हे करीत आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...