Home / विदर्भ / अकोला / *सर्वोपचार रुग्णालयात...

विदर्भ    |    अकोला

*सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिलेच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबवा - उमेश इंगळे*

*सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिलेच्या जिवाशी सुरू असलेला खेळ थांबवा - उमेश इंगळे*

 

 

अकोला प्रती - सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिलेच्या जिवाशी खेळ सुरू असून त्वरित थांबवा अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे स्थानिक भंडारज ता. पातुर जि.अकोला येथिल रहीवासी सौ अंकीता आनंद सुरवाडे या महीलेच्या जिवाशी खेळ झाल्याचा प्रकार सर्वोपचार रुग्णालयात घडला सदर प्रकार असा की, अंकिता आनंद सुरवाडे ही महिला आपल्या पतिसोबत तिच्या पोटदुखी चा त्रास होत होता म्हणून सर्वोपचार रुग्णालयात दि.१६/१२/२०२२ रोजी तपासणीसाठी आली होती वार्ड नं १०९ /१०४ /१११ मध्ये तपासणी झाल्यानंतर सोनोग्राफी करायची सांगितले , सोनोग्राफी झाल्यानंतर संबंधित डॉक्टर यांनी त्या रुग्णाला सदर रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून सांगितले व १५ दिवसांचे औषधी लिहून दिले व घ्यायची सांगितले.तरीही  त्या रुग्णाला पोटदुखी च्या त्रासाला काहीच आराम न पडल्याने सदर रुग्ण अंकिता सुरवाडे ही आपल्या पतिसोबत दि.२०/१२/२०२२ रोजी माहेर हॉस्पिटल येथे तपासणी करीता गेले असता तिथ सदर रुग्ण अंकिता सुरवाडे ही गर्भवती असुन तिला १५ दिवस झाले असे माहेर हॉस्पिटल च्या डॉक्टरांनी सांगितले म्हणून सर्वोपचार रुग्णालयात गर्भवती महिलेच्या जिवाशी खेळ सुरू असुन सोनोग्राफी चे खोटे रिपोर्ट देणाऱ्या डॉक्टर वर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी  व सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांनी प्रामुख्याने लक्ष देऊन त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र यांनी सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले,रुग्ण अंकिता सुरवाडे यांचे पती आनंद सुरवाडे प्रामुख्याने उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...