आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*वाशिम* :मालेगाव तालुक्यांतील पांगरी कुटे गावात ११ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री दरम्यान एका ३८ वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली आहे. मयत शेती आणि बचत गटाच्या कर्जामुळे तणावात असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पांगरी कुटे गावातील रहिवासी डिगांबर आनंदा कुटे वय 38 हे पांगरी कुटे शेत शिवारातील गट क्रमांक ४३० मधील त्यांच्या शेतात गव्हाची राखण करण्यासाठी दररोज जात होते. ११ फेब्रुवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे ते त्यांच्या शेतात राखणी साठी गेले होते.
दिगंबर कुटे हे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८वाजता त्यांच्याच शेतातील आंब्याच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेची माहिती शेजारील शेतकऱ्याने मृताचे चुलत भाऊ परसराम वामन कुटे यांना फोनवरून दिली. पांगरी कुटेचे पोलिस पाटील प्रकाश कुटे यांनी मालेगाव पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ज्ञानदेव भगत, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे, नायब पोलिस कांस्टेबल शैलेश ठाकूर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मालेगांव च्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
याबाबतीत मयताचा चुलत भाऊ परसराम वामन कुटे वय ४०, रा. पांगरी कुटे, तालुका मालेगाव यांनी १२फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता दिलेल्या फिर्यादीवरून मालेगांव पोलीस स्टेशन मध्ये मर्ग क्रमांक ०८ / २०२३ नोंदवून फौजदारी संहितेच्या कलम १७४ नुसार प्रकरण दाखल केले आहे.
सदर घटनेचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक गुणवंत गायकवाड करीत आहेत.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...