वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा (लाड):* स्थानीक कारंजा येथील दिनांक ११.०२.२०२३रोजी जिल्हा वाशिम अंतर्गत तालुका कारंजा येथील स्व.आ. प्रकाशदादा डहाके सभागृहात क्षयरोग व कुष्ठरोग बाबत सी. एम. इ. कंटिन्यूस मेडिकल एज्युकेशन (Continuous Medical Education) कार्यशाळेचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे तसेच सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. संजय देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले .सर्वप्रथम डॉ.मनोज गिदवाणी अध्यक्ष निमा संघटना व डॉ. अभिजित सोनटक्के आय. एम. ए.प्रतिनिधी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व क्षयरोगाचे जनक डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी वैधकिय अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनी खाजगी डॉक्टर्स यांना क्षयरोग व कुष्ठरोग बाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कारंजा येथील डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन समाधान लोनसुने यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन आरोग्य निरीक्षक रामदास गवई व पर्यंवेक्षक आत्माराम लोणारे यांनी केले. तसेच खरतडे , पाटिल , घुमरे यांचे सहकार्य लाभले.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...