आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*कारंजा (लाड):* स्थानिक उंबर्डा बाजार येथे जागृत पालक सुदृड बालक अभियान अंतर्गत महाआरोग्य शिबर तसेच महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात कारंजा येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर वनश्री राठोड यांचेकडून गर्भवती माता तसेच स्त्रियांचे विविध आजारांची तपासणी करण्यात आली. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातहि रक्तदानाचे महत्व व तसेच जागरुकता वाढावी या उद्देशाने कारंजा येथील स्वयंसेवी संस्था परिवर्तन बहुद्देशीय संस्था कारंजा लाड यांच्या वतीने स्व. आकाश प्रकाश ठाकरे यांच्या तृतीय पुण्यस्मरनार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
ग्रामीण भागातील रक्तदात्यांनी राक्तादानासाठी पुढे यावे जेणेकरून गर्भवती महिला ,थायलेसेमिया, सिकल सेलचे रुग्ण, तसेच अपघात ग्रस्ताना भासणारी रक्ताची पूर्तता होवून गरजूंचा जीव वाचेल आणि त्याचे पुण्य रक्तदात्यांना लाभेल असे आवाहन प्राथमिक आरोग्य वर्धीनी केंद्राचे वैद्यकिय अधिकारी तथा तालुका वैद्यकिय अधिकारी कारंजा डॉ शंकर नांदे यांचे वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात जि.प. सदस्या सौ .वनिताताई देवरे ,ग्रा.प. उंबर्डा बाजार चे सरपंच मा. श्री .राजभाऊ चौधरी ,पं.स. कारंजा च्या सदस्या सौ लक्ष्मीताई हळदे , शासकीय रक्तपेढीचे डॉ.श्री.उदगीरे ,परिवर्तन बहुद्देशीय संस्था कारंजा चे अध्यक्ष श्री. पंकज रोकडे,,कोषाध्यक्ष अभय राठोड ,सदस्य सुनील उघडे,सर्वेश दर्यापूरकर,योगेश निघोट,राहुल इंगोले,सुमित देशमुख आणि संपूर्ण सदस्यगण परिवर्तन बहुद्देशीय संस्था कारंजा लाड तसेच प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र उंबर्डा बाजारचे संपूर्ण अधिकारी तथा कर्मचारी आणि रुग्ण कल्याण समिती चे सर्व सदस्य गण उपस्थित होते. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कारंजा येथील स्वयंसेवी संस्था परिवर्तन बहुद्देशीय संस्था कारंजा लाड, स्व. आकाश प्रकाश ठाकरे मित्र परिवार,तसेच प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्र उंबर्डा बाजार सर्व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यात श्री. पंकज रोकडे यांनी वयाच्या १८व्या वर्षी पासून प्रत्येक वर्षी ३ वेळा या प्रमाणे वयाच्या २९ व्या वर्षी २९ वेळा रक्तदान करून समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...