Home / विदर्भ / वाशिम / *मगरूर डाॅक्टरांनमूळे...

विदर्भ    |    वाशिम

*मगरूर डाॅक्टरांनमूळे ग्रामीण भागातील रूग्णांना रूग्ण सेवा मिळणे कठीण!!* *कामरगाव ग्रामीण रूग्णालयातील प्रकार, अनेक तक्रारीनंतरही वादग्रस्त डाॅक्टर राठोड यांच्यावर वरीष्ठांकडुन कारवाई नाही, पत्रकार सोबत नेहमी वाद*

*मगरूर डाॅक्टरांनमूळे ग्रामीण भागातील रूग्णांना रूग्ण सेवा मिळणे कठीण!!*    *कामरगाव ग्रामीण रूग्णालयातील प्रकार, अनेक तक्रारीनंतरही वादग्रस्त डाॅक्टर राठोड यांच्यावर वरीष्ठांकडुन कारवाई नाही, पत्रकार सोबत नेहमी वाद*

*मगरूर डाॅक्टरांनमूळे ग्रामीण भागातील रूग्णांना रूग्ण सेवा मिळणे कठीण!!*

 

*कामरगाव ग्रामीण रूग्णालयातील प्रकार, अनेक तक्रारीनंतरही वादग्रस्त डाॅक्टर राठोड यांच्यावर वरीष्ठांकडुन कारवाई नाही, पत्रकार सोबत नेहमी वाद*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

*कारंजा ( लाड):* कामरगाव- ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेत रूग्ण सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने लोकसंख्येच्या दृष्टीने काही ठिकाणी ग्रामीण रूग्णालय, काही ठिकाणी प्राथमिक आरेाग्य केंद्र तर काही ठिकाणी आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात आली. तरीही ग्रामीण भागातील रूग्णांना मात्र वेळेत सेवा दिल्या जात नसल्याचा प्रकार  कामरगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारसाठी गेलेल्या अनेक रूग्णांसोबत घडला. कामरगाव ग्रामीण रूग्णालयातील डाॅ पराग राठोड हे रूग्णांना सेवा पुरवित नाही. उलट रूग्णांसी उधट्पणे बोलुन त्यांची दमदाटी करतात अशा अनेक तक्रारी वरीष्ठांकडे आतापर्यंत करण्यात आल्या पंरतु डाॅ राठोड यांच्यावर कोणतीही कारवाई केल्या गेली नसल्याने डाॅ राठोड यांना वरीष्ठ अधिकारी अभय तर देत नाहीत ना असा सवाल आता रूग्णांकडुन विचारल्या जात आहे. या सदर्भांत कारंजा तालुक्यातील शिवन बु येथील प्रमोद आंनदराव ढोरे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी त्यांच्या पत्नी जया प्रमोद ढोरे यांना 26 सप्टेंबर 2022 ला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेले असताना कर्तव्यावरील डाॅक्टर पराग राठोड यांनी उपचार न करता त्या महिला रूग्णाला शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले होते. त्यानंतर 27 आॅक्टेाबरला कामरगाव येथील योगेश जाधव यांच्या छातीत दुखत असल्याने व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात नेले असता त्याने  अॅडमिट होण्यासाठी कर्तव्यावरील डाॅक्टरांची विनवनी केली .तरीही डाॅक्टरांनी त्यांला अॅडमिट करून घेतले नाही. या उलट त्यांना उध्दट्पणे दवाखान्यातुन बाहेर जाण्याचा सल्ला दिला. अशातच कामरगावातील एक 58 वर्षीय इसम 3 फेबु्रवारीला मध्यरात्रीनंतर अचानकपने छतीत दुखत असल्याने त्यंाना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेले असता रूग्णालयातील कर्मचाÚयांनी जवळपास अर्धा ते पाउण तास दवाखान्याचे गेट उघडले नाही. त्यामुळे त्याच्यावर वेळेत उपचार झाले नाही. परीणामी त्यांचे निधन झाले. यावरून डाॅ राठोड यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरीष्ठ अधिकारी आणखी बळी जाण्याची प्रतिक्षा तर करीत नाही ना असा सवाल उपस्थितीत करीत डाॅ राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे. तसेच पत्रकार कोणत्याही प्रकार चे वृत संकल ना साठी गेले असता राठोड नेहमीच वाद घालतात. डॉ राठोड वर कारवाई न केल्यास कामरगाव  प्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल याची  वरिष्ठांनी सदर ग्रामीण रुग्णालयामध्ये गंभीर प्रकार घडला असता, याबाबात कामरगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वत: येऊन घडलेल्या प्रकाराची शहानिशा करून चौकशी करण्याचे आश्वासन जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.काळबांडे यांनी अजिंक्य भारत प्रतिनीधी यांना दिले.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...