वणी येथे पहिल्यांदा ८ डिसेंबर ला विदर्भस्तरीय फॅशन रनवे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
वाशिम:रिसोड येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस हवालदारासह एका खासगी इसमास दहा हजाराची लाच स्विकारताना वाशीम एसीबीच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी रंगेहात अटक केली. पोलीस हवालदार विशाल कुंडलिक एकाडे व खासगी इसम संतोष काळदाते अशी अटकेतील लाचखोरांची नावे आहेत. एकाच आठवड्यातील ही दुसरी कारवाई असून दोन कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, रिसोड पोलिसात दाखल गुन्ह्यात मदत करुन ताब्यात घेण्यात आली. दुचाकी व मोबाईल परत देण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार विशाल एकाडे व साथीदाराने वीस हजाराची लाच मागीतली. सदर लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दिली. एसीबीच्या पथकाने ६ फेब्रुवारीला केलेल्या पडताळणीच्या वेळी पोलीस कर्मचारी व खासगी इसमाने तडजोडी अंती दहा हजाराची लाच स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सापळा रचून पोलीस स्टेशनच्या आवारात लाचेची दहा हजाराची रक्कम स्विकारताना दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी दोघांविरुध्द रिसोड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके, पोलीस निरीक्षक महेश भोसले, नितीन टवलारकर, दुर्गदास जाधव, विनोद माकडे, योगेश खोटे, रवी घरत, समाधान मोघड, शेख नावेद या वाशीम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने केली आहे. दरम्यान, अनसिंग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना ताजी असताना रिसोड ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास लाच स्विकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. एकाच आठवड्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुध्द करण्यात आलेल्या एसीबीच्या कारवाईने खळबळ उडाली असून पोलीस दलातील भ्रष्टाचार उघड झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
वणी:- येथील केएफडी ॲकडमी व नागपूर येथील टिम मशुरी यांच्यावतीने पहिल्यांदा वणी येथील मूकबधिर मुले व मुली रॅम्पवर...
झरी :निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी आणि सहयोग ग्रुप मुकुटबन कडुन ग्रामीण रुग्णालय झरी येथे फळवाटप कार्यक्रम घेण्यात आला.निसर्ग...
वणी:- शहरातील माळीपुरा परिसरात सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणावर धारदार शस्त्राने जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...
*आमदाराचा एक फोन अन् आठ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा.* *विधानसभेत 'देवराव पॅटर्न'ला आरंभ; जनतेत आनंदाचा...
वणी:- येथील मूळ रहिवासी परंतु सध्या यवतमाळ येथे स्थायिक झालेले ज्येष्ठ समाजसेवक एस.पी.एम.शाळेचे निवृत्त शिक्षक सुधाकर...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...