आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*कारंजा*: दिनांक ९ फेब्रुवारी 2023 रोजी प्रसिध्द युवा कीर्तनकार ह.भ.प शिवलीला पाटील यांचे किर्तन कारंजा येथील संत गजानन महाराज संस्थान कोहिनुर कॉलनी येथे सायंकाळी ८ ते १० वाजता होणार आहे. या प्रसिध्द कीर्तनकाराच्या अमृतमय वाणीतून कारंजा वासीयांना कीर्तनाचा लाभ होणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज संस्थान कोहिनूर कॉलनी ,मानोरा रोड यांनी केले आहे.संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्य हा महोत्सव साजरा होत असुन दि.६ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन व्यसनमुक्ती सम्राट भागवताचार्य ह.भ.प रामेश्वर महाराज खोडे रा. ईसापूर यांचे अमृतमय वाणीतून श्रीमद भागवत कथा दररोज दुपारी १ते४ वाजता होणार आहे.हा ज्ञान यज्ञ असुन व्यसनमुक्ती सप्ताह आहे.तसेच दि.०६ फेब्रुवारी रोजी परमपुज्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री श्री ईश्वरान्दजी श्री श्री उत्तमस्वामीजी महाराज यांचे प्रवचन सायंकाळी ७.३० ते ८.३० ला संपन्न होणार आहे.तरी या आशिर्वाद प्रवचन व दर्शन सोहळ्याचा व सप्ताहातील सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ कारंजा वासीयांनी घ्यावा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोहिनूर कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष व इतर
पदाधीकारी ,सदस्य व परिसरातील कॉलनीतील भाविक भक्तांच्या वतीने करण्यात येत आहे.
दि.13 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द व्यसनमुक्ती सम्राट हभप मधुकर महाराज खोडे यांचे काल्याचे कीर्तन दुपारी १२ ते १ वाजता संपन्न होत आहे.या कार्यक्रमात खालील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मा . आ . श्री राजेंद्रजी पाटणी साहेब, कारंजा-मानोरा मतदार संघ
मा . श्री . चंद्रकांतदादा ठाकरे, जि.प. अध्यक्ष वाशिम मा . श्री . दत्तराजजी डाहाके , माजी नगराध्यक्ष , कारंजा मा . श्री . सुनिल पाटील धाबेकर , अध्यक्ष , सुतगिरणी मा . श्री . युसूफसेठ पुंजाणी रा.काँ . नेते
मा.श्री.हेमेंद्रदादा ठाकरे माजी जि.प. सभापती
मा.श्री.शेखरभाऊ बंग भारत गॅस संचालक
मा.श्री.जयेश सेठ लोडाया संचालक जिनिंग प्रेसिंग मा.श्री ललीतसेठ चांडक संचालक कृष्णा बाजार
मा.श्री डॉ.राजीव काळे भाजपा तालुकाध्यक्ष
मा.श्री यशवंतबाप्पु देशमुख माजी संचालक साखर कारखाना ईत्यादी आणि श्री संत , महाराज , देणगीदाते व इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा यावेळी होणार आहे.
येथे होणारे सप्ताहातील कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
६/२/२०२३ सोमवार सकाळी ९ ते १० - ग्रंथदिंडी पसरणी रोड ते संत गजानन महाराज मंदीर पर्यंत मुख्य मार्गाने सायंकाळी ७.३० ते ८.३० आर्शीवाद प्रवचन व दर्शन सोहळा परमपुज्य श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्री श्री ईश्वरान्दजी श्री श्री उत्तमस्वामीजी महाराज यांचे प्रवचन.दि . ७ / २ / २०२३ मंगळवार सायंकाळी ८ ते १० मैफील स्वरांची जिवनांशी संघर्ष करण्याच्या प्रेरणादायी संगीतमय कार्यक्रम सादरकर्ते चेतन सेवांकुर आर्केस्टा , वाशिम.
दि . ८/२/२०२३ बुधवार सायंकाळी ८ ते १० सप्तखंजेरी वादक बालकिर्तनकार ह . भ . प . वैभव ठिलोरकर महाराज , कारंजा .
दि . ९ / २ / २०२३ गुरुवार सायंकाळी ८ ते १० युवाकिर्तनकार शिवलिलाताई पाटील यांचे जाहीर किर्तन साथसंगत- मुदंग विशारद ह.भ.प. श्री गजानन महाराज तिडके आळंदीकर गायनाचार्य ह.भ.प. हनुमान महाराज आळंदीकर ह.भ.प. माधव महाराज आळंदीकर
दि . १०/२/२०२३ शुक्रवार सायंकाळी ८ ते १० गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम सहभाग संजयभाऊ ताथोड आणि संच
दि ११/२/२०२३ शनिवार सायंकाळी ८ ते १० अध्यात्मीक सत्संग आर्ट ऑफ लिव्हींग सहभाग- डॉ . सुशिल देशपांडे व सहकारी.
दि . १२/२/२०२३ रविवार सायंकाळी ८ ते १० सुरसंगम म्युझीकल आर्केस्टा गायन पारवा सादकर्ते श्री प्रविण पाटील लुंगे व सहकारी.
दि . १३/२/२०२३ सोमवार
सकाळी ५.३० ते ६.३० ' श्रीं ' चा अभिषेक
सकाळी ६.३० ते ७.३० होमपुजा
सकाळी ८ ते १० - पालखी सोहळा ( कॉलनी परिसर ) सकाळी १० ते १२ व्यसनमुक्ती सम्राट गुरुवर्य . प . श्री मधुकर खोडे महाराज यांचे काल्याचे किर्तन दि . १३/२/२०२३ सोमवार दुपारी १२ ते १
दि.१३/२/२०२३ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळ चांभई - मंगरुळनाथ यांची भजन मैफिल • दुपारी १ वा . ते रात्री १० वाजे पर्यंत.
सोमवार दि . १३/२/२०२३ भव्य महाप्रसाद दुपारी १ ते रात्री १० पर्यंत आहे.कार्यक्रम स्थळी कोहिनुर कॉलनी व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली आहे.येथे संपन्न होत असलेल्या सप्ताहातील दैनदिन कार्यक्रमात सायंकाळी ६ते ७ आखातवाडा येथील जयबजरंग मंडळ हरिपाठ करणार आहेत.मृदंगाचार्य ह.भ.प वैभव महाराज सुपलकार आळंदीकर,गायनाचार्य ह.भ.प शेषराव महाराज अवताडे आळंदीकर,श्री विलास महाराज सुपलकार यांचा श्रीमद भागवत कार्यक्रमात दैनंदिन सहभाग राहणार आहे.असे श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी कोहिनुर कॉलनी येथील संत गजानन महाराज संस्थानचे अध्यक्ष विजय राऊत यांच्यासी संपर्क साधावा कार्यक्रमाचे यशस्वीते करिता श्री संत गजानन महाराज संस्थान कोहिनूर कॉलनी येथील सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच नागरिक आणि परिसरातील कॉलनीतील नागरिक, भाविक भक्त परिश्रम घेत आहेत.असे राजीव भेंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात कळविले आहे.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...