वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गोंदिया:-गोंदिया जिल्ह्यातील
सालेकसा तालुक्यातील कचारगड पहाडीवर ३ते७ फेब्रुवारी पर्यंत आदिवासी संस्कृतीवर आधारित यात्रा भरलेली आहे. या यात्रेत अनेक राज्यातील आदिवासी बांधव वेगवेगळा वेशभुषा परिधान करून आपली मुळनिवासी संस्कृती प्रदर्शित केले.लाखोच्या संख्येने उपस्थित होते. या लोकांना आपली संस्कृती काय आहे हे कळावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व आदिवासी गोंडवाना गोटुल समितीच्या वतीने प्रबोधन शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे अध्यक्ष जनार्धन ताकसांडे होते. प्रमुख मार्गदर्शक भोजराज कान्हेकर, साईनाथ पुंगाटी, प्रेमलाल वनकर, हरिश्चंद्र कन्नाके होते.
अध्यक्षीय भाषणात जनार्धन ताकसांडे म्हणाले की, कुपार लिंगो गण व्यवस्थेचे प्रमुख होते. गण व्यवस्थेत जाती नव्हत्या.त्यांच्यात स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय होता. सध्या त्यांची मुळनिवासी संस्कृती नष्ट झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपली संस्कृती जिवंत ठेवावे.त्यानंतर भोजराज कान्हेकर म्हणाले की, आदिवासी हा हिंदू नाही. तो निसर्ग पुजक आहे. हिंदू बनून आदिवासी संस्कृती नष्ट केली तर त्यांचे संविधानिक अधिकार नष्ट होतील व पुन्हा अस्पृश्य होतील,याचे भान ठेवावे.
साईनाथ पुंगाटी म्हणाले की, आदिवासी गरीब व अडानी असल्याने त्यांचा फायदा आदिवासी नेते व प्रस्थापित सरकार घेत आहे. त्यामुळे आदिवासींनी जागरूक होऊन आपल्या अधिकारासाठी संघर्ष केला पाहिजे. तसेच प्रेमलाल वनकर व हरिश्चंद्र कन्नाके यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिराचे संचालन यशवंत नैताम यांनी केले तर आभार मालता पुडो यांनी मानले.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी ज्योती कन्नाके, विश्वेश्वर मेश्राम, धनश्री सिडाम, कालिदास पदा, शामलता पदा, नमन पोटावी ,संगिता अलाम, शेमनशाहा आत्राम, माधुरी शेमले, किशोर आत्राम, उज्ज्वला आत्राम, निलकंठ कुलसंगे, अलका कुलसंगे, पुंडलिक मडावी, जानिक जुमनाके, गंगाधर गेडाम, तुलसी मडावी, मारोती इष्टम, अर्चना टेकाम, सरिता होळी, कल्पना नैताम, ममता धुर्वे, चैतन्या सयाम, हेमलता सलामी, नलिनी सुरपाम, विजया गेडाम, विद्या दुग्गा, गोमाजी उसेंडी, हिरामन कुळमेथे, निशा कुळमेथे,जानिक जुमनाके, सुमन पदा, लक्ष्मन बांबोळे, अंजली कोडापे, मिरा कोवे इत्यादी आदिवासी बांधवांनी सहकार्य केले.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...