आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*वाशिम:* सुकन्या समृद्धी योजनेचा सातवा वर्धापन दिन भारतीय डाक विभागा कडुन २४ जानेवारीला साजरा करण्यात आला पोस्ट विभाग मुलींचे भविष्य उज्वल व सक्षम करण्याची संधी देत आहे. सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची एक छोटी ठेव योजना आहे. जी केवळ मुलींसाठी आहे. "बेटी बचाव बेटी पढाओ" चा तो एक भाग म्हणून सुरू करण्यात आला असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील तळागळातील घराघरात पोहोचवण्याचे आवाहन वाशिम पोस्ट कार्यालयाचे उपविभागीय डाक निरिक्षक निलेश वायाळ यांनी केले. ते आज ४फेब्रुवारी रोजी मालेगाव येथील उप डाक घर कार्यालयात आयोजित सुकन्या समृद्धी उद्दिष्ट पूर्ती मेळावा प्रसंगीबोलत होते.
मुलीच्या उच्च शिक्षणासाठी व तिच्या विवाहासाठी तसेच महिला सक्षमीकरण करणे या उद्देशाने भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे. मुलीच्या उज्वल भविष्यासाठी राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून १० वर्षाखालील मुलींचे उज्वल भविष्य साधण्यासाठी सुकन्या खाते काढल्यापासून १५ वर्षे दरमहा रक्कम भरल्यास २१ व्या वर्षी ७.६ टक्के प्रमाणे रक्कम मिळणार आहे. दरमहा बचत १ हजार रुपये केल्यास एका वर्षात १२ हजार रुपये रक्कम जमा होईल.१५ वर्षात ही रक्कम १ लाख ८० हजार रुपये जमा होईल.मुलीच्या २१ व्या वर्षात ३ लाख ३० हजार ३७३ रुपये जमा होईल. २१ व्या वर्षात चालू व्याजावर मिळणारी एकूण रक्कम ५ लाख १० हजार ३७३ एवढी असणार आहे.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत ० ते १० वर्षाच्या आतील मुलींना या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून ग्रामीण डाक सेवकांनी उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करून योजना ग्रामीण भागातील तळागाळातील जनते पर्यंत पोहोचवून सुकन्या योजनेचा लाभ द्यावा .सुकन्या खाते किमान २५० रुपयांमध्ये उघडता येते. हे खाते काढल्यापासून १५ वर्ष पैसे भरावे लागतात. सुकन्या समृद्धी हे खाते उघडल्यापासून २१ व्या वर्षापर्यंत खात्याची मुदत आहे. मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर, मुलीचे लग्न झाल्यास एस.एस.वाय खाते मुदतपूर्व बंद करता येते.सुकन्या खात्यामध्ये कमीत कमी वार्षिक २५० रुपये व जास्तीत जास्त १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. खाते काढण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत,नगरपालिका,महानगर पालिका यांनी जारी केलेले मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरी या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलींच्या पालकांनी लाभ घ्यावा.असे आवाहन वाशिम डाक विभागचे उपविभागीय अधिकारी निलेश वायाळ यांनी मालेगाव उपडाकघरात आयोजित ग्रामीण डाक सेवकांच्या उद्दिष्ट पूर्ती मेळावा प्रसंगी केले. यावेळी पोस्टमास्टर व्ही एम मुंडे पोस्टल असिस्टंट योगेश आरू, बालाप्रसाद शातलवार, संतोष कड ,विजय खराटे यासह शिरपूर व मालेगाव उप डाक घरांतर्गत सर्व ग्रामीण डाक सेवक उपस्थित होते.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...