संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती 'मातृ दिवस' म्हणून घोषित करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
माता रमाबाई यांनी आपल्या जीवनात अपार त्याग व कष्ट केले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षणासाठी विदेशात असताना माता रमाबाईंनी आपल्या मुलांसाठी प्रचंड कष्ट घेऊन एक आदर्श माता कशी असावी? व एक आदर्श पत्नी कशी असावी? हे त्यांनी आपल्या जीवनात समस्त स्त्रियांना दाखवून दिले. फेब्रुवारी महिन्याच्या ७ तारखेपासून आपण इंग्रजी संस्कृतीचे अनुकरण भारतात मोठ्या प्रमाणात करतो. ७ तारखेपासून व्हॅलेंटाईन डे आठवडा सुरु होतो. दिनांक ७ फेब्रुवारीला 'रोज डे' ने या आठवड्याची सुरुवात होते. परंतु ७ फेब्रुवारीलाच माता रमाईची जयंती असते आणि या त्यागमूर्ती माताची महाराष्ट्रातील जनतेला मात्र आठवण येत नाही. खरंतर तरुण-तरुणींना इंग्रजी संस्कृतीशी जोडण्याचे काम देशातील काही तथाकथीत लोक करीत असून भारताचा सत्य इतिहास लपवण्याचे हे एक षडयंत्र आहे .आणि याला आमचे सर्व तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनी बळी पडत आहेत. माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीला पूर्ण महाराष्ट्रभर 'मातृ दिवस' म्हणून घोषित करण्यात यावे व हा दिवस 'मातृ दिवस' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेड, मंगरुळपीरच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष रमेश मुंजे, तालुकाध्यक्ष अजय गवारगुरु, तालुका प्रवक्ता शिवाजी गजभार, तालुका उपाध्यक्ष योगेश ठाकरे, तालुका संपर्क प्रमुख हरीश गव्हाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...