आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:* *दामोदर जोंधळेकर*
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मौजे वाईगौळ येथे 'प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना' पीएमएफएमई सप्ताह निमित्त तालुकास्तरीय कार्यशाळा अत्यंत उत्साहात व लक्षणीय प्रतिसादात संपन्न झाली. यावेळी, प्रमुख मार्गदर्शक म्हणून 'पीएमएफएमई' योजनेचे वाशिम जिल्हा समन्वयक गोपाळ मोठाळ, स्टेट बँक ऑफ इंडिया, मानोरा शाखेचे व्यवस्थापक पंकज शरणागत, तालुका कृषि अधिकारी व्ही.के. घोडेकर, मंडळ कृषि अधिकारी जी.व्ही. जैताडे, 'माविम' च्या तालुका व्यवस्थापिका कुसुम रुपने, "उमेद" च्या प्रभाग संघ अध्यक्षा चित्रा वानखेडे, माधुरी कांबळे, वंदना संतोष खंडारे, वंदना शंकर खंडारे, ज्योती खंडारे, ज्योती पवनकार, प्रज्ञा कांबळे, सदर योजनेत ऑनलाईन अर्ज व उद्योग उभारणी करिता तांत्रिक सहाय्यक म्हणून नेमलेले डी.आर.पी. उमेश जंगले, दुष्यंन्त चौधरी, कोमल वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार जगदीश राठोड, प्रगतीशील शेतकरी मुंगशीराम उपाध्ये, अँड. श्रीकृष्ण राठोड, संतोष खंडारे, राजू भोयर, कृषि सहाय्यक डी.के. अवगण, व्ही.पी. रणबावळे, जे.आर. धामणीकर, आर.एन. चव्हाण, आर.जी. महिंद्रे, एस.जी. शिंदे, कु. बी.एस. चौढाळे, कु. ए.व्ही. सुरजुसे, कु. आर.जी. पाटील, कु. पी.एस. चोरे, कु. एस.के. पत्रे, 'शेकडो'हून अधिक शेतकरी/महिला शेतकरी, 'आत्मा' अंतर्गत शेतकरी गट, 'उमेद' अंतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता बचत गट, 'माविम' अंतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता बचत गट प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थिती मध्ये सर्व प्रथम हरित क्रांतीचे
प्रणेते व महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमेचे पुजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली. तेंव्हा प्रथमता मंडळ कृषि अधिकारी जैताडे यांनी सुक्ष्म अन्नखाद्य प्रक्रिया उद्योग विषयक तालुकास्तरीय कार्यशाळेचे प्रास्ताविक केले तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शनही केले. स्टेट बँक ऑफ इंडिया, मानोरा शाखेचे व्यवस्थापक शरणागत यांनी 'पीएमएफएमई' अंतर्गत मानोरा तालुक्यातील सद्यस्थितीत मंजूरी प्रक्रियेत असलेल्या विविध अन्न प्रक्रिया आधारीत सुक्ष्म उद्योगांची माहिती, व बँक कर्जास आवश्यक कागदपत्रे, कर्ज मंजुरीसाठी बँकेद्वारा पडताळणी होणाऱ्या व आवश्यक असणाऱ्या विविध बाबींविषयी मार्गदर्शन केले. एस.बी.आय. बँक सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी यापुढे सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी सर्वांना दिली. पी.एम.एफ.एम.ई. योजनेचे जिल्हा समन्वयक मोठाळ यांनी योजनेची वैशिष्ट्ये, लाभार्थी निवडीचे निकष, नवीन व सद्यस्थितीत चालू सुक्ष्म अन्नखाद्य प्रक्रिया उद्योग वाढीसाठीची कार्यपद्धती, सामायिक पायाभूत सुविधा घटक, अनुदान, बँक कर्ज, लाभार्थी हिस्सा आदी तांत्रिक व प्रशासकीय बाबींविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. सुक्ष्म अन्नखाद्य प्रक्रिया विविध उद्योग, उद्योगाची निवड, उद्योजकीय कौशल्ये व निवडलेल्या प्रक्रिया उद्योगाची प्राथमिक माहिती यांची आवश्यकता, बँक कर्ज मंजुरी व उद्योग उभारणीसाठी आवश्यक बाबी, योजनेच्या विविध टप्प्यांवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी व त्यावर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयी सखोल माहिती उपस्थितांना दिली. उपस्थितांचे प्रश्नास मार्गदर्शन स्वरुप उदाहरणा दाखल समर्पक उत्तरे देऊन शंकांचे निरसन देखील केले. पी.एम.एफ.एम.ई. योजनेत अर्ज प्रकियेत असणाऱ्या काही महिलांनी देखील सदर योजने विषयी आपले अनुभव व मनोगत यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात सर्व उपस्थितांना पी.एम.एफ.एम.ई. योजनेची माहिती पत्रिका/पाम्प्लेट देखील वितरीत करण्यात आले.
तालुका कृषि अधिकारी घोडेकर यांनी आपले अध्यक्षीय भाषणात शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचे महत्व विषद केले. सदर योजनेची गेल्या सहा महिन्यांतील दुसरी कार्यशाळा असल्याचे व तालुका कृषि विभाग योजनेचे मार्गदर्शन व आवश्यक प्रशासकीय सहाय्य करिता सदैव तत्पर असल्याचे यावेळी सांगितले. 'पी.एम.एफ.एम.ई.' योजने अंतर्गत जास्तीत जास्त प्रस्ताव आपले कृषि सहाय्यक व डी.आर.पी. यांचेकडे सादर करावे. यशस्वीपणे सुक्ष्म उद्योग-व्यवसाय उभारणी करुन योजनेचा जास्तीत लाभ सर्वांनी घ्यावा व त्यातून आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन उपस्थित तमाम शेतकरी, महिला शेतकरी व महिला स्वयंसहाय्यता बचत गट यांस यावेळी त्यांनी केले. कृषि सहायिका कु. बी.एस. चौढाळे यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन व कृषि सहायक डी.के. अवगण यांनी आभार प्रदर्शन केले.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...