Home / विदर्भ / वाशिम / *तुर चोरी प्रकरणातील...

विदर्भ    |    वाशिम

*तुर चोरी प्रकरणातील तीन चोरांना रीसोड पोलिसांनी ताब्यात घेतले*!!

*तुर चोरी प्रकरणातील तीन चोरांना रीसोड पोलिसांनी ताब्यात घेतले*!!

*तुर चोरी प्रकरणातील तीन चोरांना रीसोड पोलिसांनी ताब्यात घेतले*!!

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

*वाशिम* : रिसोड तालुक्यातील कांकरवाडी येथील 31 जानेवारी रोजी रात्री घडलेल्या तुर चोरी प्रकरणी रिसोड पोलिसांनी तीन चोरांना ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील कंकरवाडी गावातील रहिवासी अंकुश जायभाये यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ३१ जानेवारी २०२३रोजी त्यांनी आपल्या नातेवाईकाच्या घरी बाहेर ओट्यावर तुरीचे 17 कट्टे ठेवले होते.रात्री 1.30 वाजता त्यांना जाग आला असता तुरीच्या कट्टे असलेल्या ठिकाणी गेल्यावर 3 पोती गायब आढळून आली.  यावर त्यांनी नातेवाइकांना जागे करून चौकशी केली असता जायभाये यांनी त्यांचे कुटुंबीय व नातेवाइकांसह शोध घेतला असता २ वाजेच्या सुमारास एका शेतकऱ्याने त्यांना गावाजवळील हनुमान मंदिराजवळ दोन मोटारसायकलस्वार दिसले असल्याचे सांगितले. शेतकऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर त्याला गोपाळ फुपाटे नावाचा व्यक्ती तेथून पळताना दिसला. संबंधित ठिकाणी पाहिल्यानंतर तेथे दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे दिसून आले.  आणि त्याची तीन कट्टा तुर ज्याची किंमत अंदाजे ₹ 15 हजार आहे तेथेच आढळळी. 112 वर डायल करून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. आज 1 जानेवारी रोजी सकाळी अंकुश जायभाये यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून.कंकरवाडी गावातील गोपाल फुफाटे, भागवत डाखोरे, मनोहर जाधव यांना ताब्यात घेण्यात आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...