Home / विदर्भ / वाशिम / *मालेगाव पोलीसांची...

विदर्भ    |    वाशिम

*मालेगाव पोलीसांची कामगिरी १०लाख९४ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त.*

  *मालेगाव पोलीसांची  कामगिरी १०लाख९४ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त.*

*पथ दिव्यांचे  लोखंडी पोल चोरणारांना रंगेहाथ पकडले!!*

 

 

*मालेगाव पोलीसांची  कामगिरी १०लाख९४ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त.*

 

  *वाशिम जिल्हा:प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर*

 

*वाशिम* : मालेगाव येथील पथदिव्यांचे लोखंडी खांब तुकडे करून भंगारात विकत असतांना चोरट्यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या कडुन १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कामगिरी  मालेगाव पोलीसांनी ३०जानेवारी रोजी सायंकाळ दरम्यान केली.                मालेगाव शहरातील एका भंगार दुकानावर चोरीचे लोखंडी खांब विकण्यासाठी अज्ञात व्यक्ती येत असल्याची गुप्त माहिती मालेगाव पोलीसांना  मिळाल्या वरून मालेगाव पोलिस स्टेशनचे  पोलीस उपनिरीक्षक राहुल सुधाकर गंधे यांनी

पोलीस कॉंस्टेबल अमोल पाटील

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रवी सैबेवार पोलीस हेड काॅस्टेबल कैलास कोकाटे, प्रशांत वाढणकर यांच्या  सहका-या समवेत शहरात शोध घेतला असता मालेगाव तहसील नजिकच्या नविन बस स्टॅन्ड  जवळील एका भंगार दुकाना कडे चारचाकी मालवाहू पिक अप गाडी ज्यामध्ये पथदिव्यांचे लोखंडी खांबाचे तुकडे घेवुन जातानी दिसली.यावेळी सदर गाडीचा पाठलाग केला असता गाडी थेट एका भंगार दुकाणा समोर आढळून आली असता भंगार दुकानात जावून सदर पिक अप गाडीचा चालक  सोहेल खान अयाजखान व त्याचा साथीदार विशाल विष्णू नानोटे यास विचारपुस केली असता त्यांनी गाडीतील लोखंडी खांबाचे कोणत्याही प्रकारचे बिल किंवा इतर कोणतेही कागदपत्रे दाखविले नाहीत त्यानुसार मालेगाव पोलीसांनी  पिक अप गाडी क्रमांक एम एच ३७ टि २२५३ किमंत ९लाख  रुपये व १३ लोखंडी पोलचे तुकडे किमंत अंदाजे ७८हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला त्यासोबतच चोरट्यांनी  तामसी रोडने सुद्धा आणखी चोरीचा माल लपवल्याचे समजल्या  वरून तामसी फाटा येथील  घटना स्थळा वरुन सहा लोखंडी खांबाचे तुकडे किमंत ३६हजार रुपये  व अखंड आठ लोखंडी खांब किंमत अंदाजे ८०हजार रुपये असा एकूण १०लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे.सदर प्रकरणी मालेगाव पोलिसांनी कलम 41(1)(ड) जा. फो. प्रमाणे कायमी करण्यात आली असुन घटनेच्या  अधिक तपासासाठी आरोपींना वाशिम ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मालेगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल गंधे यांनी दिली.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...