आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
वाशिम: मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या जानगीर महाराज संस्थान मध्ये १२ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या काळात महाशिवरात्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संस्थांमध्ये श्रीमद् भागवत कथा, किर्तन भजन, महाप्रसादासह मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाशिवरात्री सोहळ्याची सांगता १९ फेब्रुवारी तर महाप्रसादानंतर २० फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणुकीने होणार आहे.
पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जानगीर महाराज संस्थान मध्ये दरवर्षी महाशिवरात्री सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याप्रमाणे यावर्षीही १९ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या काळात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त संस्थान मध्ये ह भ प पुरुषोत्तम महाराज महाळंकर यांच्या वाणीतून श्रीमद् भागवत कथा निरूपण होणार आहे. यासोबतच महाशिवरात्रि सोहळा काळात दररोज नगर प्रदक्षिणा, काकडा, भजन, विष्णुसहस्त्रनाम, हरी किर्तन, भजन भक्ती, काकडा इत्यादी कार्यक्रमही पार पडणार आहेत. तसेच १२ फेब्रुवारी रोजी रामेश्वर महाराज बीड,१३ फेब्रुवारी रोजी प्रशांत महाराज ताकते आकोट,१४ फेब्रुवारी संतोष महाराज पळसूनेकर हिंगोली,१५ शिवा महाराज मानकर आळंदी,१६ दिलीप महाराज भुसारी आळंदी,१७ गोविंद महाराज आरगळकर आळंदी,१८ संजय महाराज लहाने करंजी यांची कीर्तन सेवा घडणार आहे. १८ फेब्रुवारी महाशिवरात्रि निमित्त कैलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर अभिषेक महापूजा श्रीराम जोशी वैभव देवळे सिताराम शांडिल्य यांच्या पुरोहितयाने होणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी दुपारी भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येईल. तत्पूर्वी शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार संत जानगीर महाराज यांचे समकालीन मित्र मुस्लिम संत हजरत मिर्झा बाबा यांच्या दर्ग्यात जाऊन महाशिवरात्रीचा महाप्रसाद मिर्झा बाबा यांच्या दर्ग्याला अर्पण करण्यात येईल.२० फेब्रुवारी रोजी विदर्भ मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्यांचा सहभाग असलेली जानगीर महाराज यांची पालखी मिरवणूक नगरातून काढण्यात येईल. मिरवणूक विसर्जनाने महाशिवरात्री उत्सवाची सांगता होईल. महाशिवरात्री उत्सवाचे सर्व कार्यक्रम संस्थांचे चौथे मठाधिपती महेशगीर बाबा यांच्या मार्गदर्शनात पार पडतील.
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...