Home / विदर्भ / गडचिरोली / *बदलती जीवनशैली कर्करोगाच्या...

विदर्भ    |    गडचिरोली

*बदलती जीवनशैली कर्करोगाच्या वाढीसाठी जबाबदार* डॉ स्वप्नील अग्रवाल

*बदलती जीवनशैली कर्करोगाच्या वाढीसाठी जबाबदार*     डॉ स्वप्नील अग्रवाल

*बदलती जीवनशैली कर्करोगाच्या वाढीसाठी जबाबदार*

   डॉ स्वप्नील अग्रवाल

 

✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

गडचिरोली:--कर्करोग म्हणजे शरीरात असामान्य पेशींची अनियंत्रित वाढ होय. आज देशात कर्करोगांचे जवळपास 200 प्रकार असून कर्करोगांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण, बदलती जेवण पद्धती, वंध्यत्व आणि वाढते व्यसन या सर्व बाबी कर्करोगाच्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचे टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मुंबई चे कर्करोग तज्ञ डॉक्टर स्वप्नील अग्रवाल यांनी लायन्स क्लब गडचिरोली आणि गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट केअर क्लिनिक येथे आयोजित मोफत कॅन्सर रोगनिदान व मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन प्रसंगी उपस्थिताना केले. यावेळी  लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लॉ. बाळासाहेब पद्मावार, विद्यमान अध्यक्ष डॉ. सविता सादमवार, सचिव महेश बोरेवार, कोषाध्यक्ष ममता कुकुडपवार, केमिस्ट अँड ड्रगिस्त असोसिएशन नागपूर झोनचे अध्यक्ष सुरेश सारडा, जिल्हाध्यक्ष देवेंद्र सोमनकर, सदस्य राजेश ईटणकर, गायत्री सोमनकर, रमाकांत तिवारी, लायन सदस्य डॉ सुरेश लडके, शेषराव येलेकर, शांतीलाल सेता, गिरीश कुकुडपवार, सुनील देशमुख, नीलिमा देशमुख तसेच शहरातील व आजूबाजूच्या तालुक्यातून आलेले शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     डॉक्टर अग्रवाल पुढे म्हणाले, आज विज्ञानामुळे कर्करोगाचे निदान आणि उपचारांमध्ये प्रगती केली असून अनेक अद्यावत पद्धतींचा वापर केला जात आहे. कर्करोगाचे रोगनिदान लवकरात लवकर होणे गरजेचे आहे त्यासाठी खास शिबिरे भरवून कर्करोगाविषयी माहिती त्याचे निदान व उपचार याविषयी प्रचार प्रसार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले कर्करोगाचे निदान पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये झाल्यास आणि वेळेत उपचार सुरू केल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो असेही ते म्हणाले यावेळी त्यांनी 45 रुग्णांची तपासणी केली त्यातून 12 रुग्णांमध्ये कर्करोगाची संभाव्य लक्षणे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण निदानासाठी कर्करोगाच्या इतर चाचण्या करून घेण्याचे रुग्णांना सांगण्यात आले असून पूर्ण निदान होऊन कर्करोग झाल्याचे निश्चित झाल्यानंतर अशा रुग्णांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

  यावेळी चामोर्शी तालुक्यातील मालेरमाल या गावचे रुग्ण खुशाल पत्रुजी कावळे यांनी डॉ. अग्रवाल यांच्या उपचारामुळे माझ्यामध्ये चौथ्या स्टेजमध्ये असलेला मुखाचा कर्करोग पूर्णपणे बरा झाल्याचे आपल्या मनोगतातून  सांगितले.

    या शिबिरासाठी दंतरोग तज्ञ डॉ शर्वरी इटणकर, डॉ साक्षी साळवे यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले. हे शिबिर घडून आणण्यासाठी स्मार्ट केअर फार्मसी च्या संचालिका गायत्री सोमनकर, लॉयन सदस्य सुरेश लडके, मदत जिवानी,प्रा. देवानंद कामडी, शेषराव येलेकर, सतीश पवार, नितीन चेंबूलवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...