Home / विदर्भ / वाशिम / *सहारा कॉलनीवासीय दीर्घ...

विदर्भ    |    वाशिम

*सहारा कॉलनीवासीय दीर्घ कालावधीपासून रस्त्याच्या प्रतिक्षेत शहरातील अतिक्रमण,रस्ते आणि सुरक्षा आदीं समस्येचा निपटारा करा!! अनुप ठाकरे*

*सहारा कॉलनीवासीय  दीर्घ कालावधीपासून रस्त्याच्या प्रतिक्षेत शहरातील अतिक्रमण,रस्ते आणि सुरक्षा आदीं समस्येचा निपटारा करा!!  अनुप ठाकरे*

*सहारा कॉलनीवासीय  दीर्घ कालावधीपासून रस्त्याच्या प्रतिक्षेत शहरातील अतिक्रमण,रस्ते आणि सुरक्षा आदीं समस्येचा निपटारा करा!!  अनुप ठाकरे*

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*

 

कारंजा (लाड):स्थानीक कारंजा  शहरातील सहारा कॉलनी मधील नालीचे पाणी,सांडपाणी तसेच रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत आणि रस्त्याचे काम त्वरित करण्याबाबत अनुप ठाकरे यांच्याकडे सहारा कॉलनीवासीयांनी निवेदनाव्दारे मागणी केली.

सहारा कॉलनी मधील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असुन या मार्गावर खुप मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे कॉलनीतुन येजा करण्याकरिता वाहन चालक व  नागरिकांना मोठया प्रमाणात कसरत करावी लागत आहे. हे रस्ते खड्यात का खड्डे रस्त्यात आहे हेच बघणाऱ्यांना कळत नाही.या रस्त्याचा त्रास वाहन चालकांना होतो. याबाबत नगर परिषदकडे वारंवार तक्रारी केल्या परंतु या कडे कारंजा न.प.कानाडोळा करून आहे. यामुळे छोटे मोठे अपघात बरेच वेळा झालेत व सतत होत असतात.तसेच सहारा कॉलनीतील नाल्यांचे बांधकाम झाले नसून अगदी उघड्यावरून व रस्त्यातून सांडपाणी वाहताना दिसते तरी नगरपरिषदेने नाल्यांचे काम लवकर करून द्यावे व सांडपाण्याची विल्हेवाट लावावी.सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून रहिवाश्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाले आहे.तसेच कॉलनीत पथदिवे नसल्यामुळे नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडत आहे. रस्ते खराब,पथदिवे बंद अश्या दयनीय परिस्थितीचा अर्थातच भुरटे चोर फायदा उचलत आहेत व परिणामी कॉलनीत चोरीचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे स्थानिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीच्या वेळेला कॉलनी मधील नागरिकांना भाजीपाला,किराणासारख्या खरेदी करण्याकरिता बाहेर पडावे लागते.परंतु पथदिवे नसल्याकारणाने कॉलनीत सर्वत्र अंधार असते व अनेकदा चोरटे त्याचा फायदा घेऊन हात साफ करतात. यामध्ये नागरिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सहारा कॉलनीमध्ये अजुनपर्यंत घंटा गाडी सुरळीत नाही तरी ती सुरळीत चालु करण्यात यावी.तसेच रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमणामुळे रहदारीला अडचण निर्माण होत आहे. तरी रस्त्यावरील अतीक्रमण त्वरित काढण्यात यावे व रहदारीस रस्ता मोकळा करून देण्यात यावा.

सहारा कॉलनी मधील नाल्यांचे बांधकाम,पथदिवे व रस्त्याचे डांबरीकरण किंवा कॉक्रीटीकरण त्वरीत करण्यात यावे.अशी मागणी अनुप ठाकरे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...