संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
*मंगारुळनाथ* : स्थानीक मंगरुळनाथ येथिल योग तपस्वी संत श्री. बिरबलनाथ महाराज यांचा ९४ वा यात्रा महोत्सव दि.८फेब्रुवारी२०२३ ते १७ फेब्रूवारी २०२३ पर्यंत साजरा होणार असून संस्थान कडून विविध धार्मीक सामाजीक कार्यक्रमांचे भरपूर प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. दि.५ फेब्रुवारी रोजी पोर्णिमा रविवार रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० पर्यंत श्री. बिरबलनाथ महाराज यांचे ग्रंथ वाचन ह.भ.प.श्री.उत्तमराव पाटील गावंडे रा. वरुड यांचे मधुर वाणीतून होणार
आहे .व दुपारी ४ ते सायंकाळी ७ श्री.बिरबलनाथ महाराज यांनी दोन ते तिन महिने अगोदर जाहिर करून जिवंत संजीवन समाधी घेतलेल्या दिना निमित्त अभिषेक, होमहवन व पुजेचा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दि.०८फेब्रुवारी रोजी बुधवार सकाळी ९:०० वाजता वेदशास्त्र संपन्न ब्राम्हणांच्या हस्ते "श्री." ची
महापुजा व अभिषेक चा कार्यक्रम आयोजीत केला आहे. दि.०९रोजी रात्री
०८ ते १० वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महिला भजनी मंडळ मंगरुळनाथ यांचे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि१०फेब्रुवारी२०२३ रोजी शुक्रवार सत् साहेब भजनी मंडळ मंगरुळनाथ यांचे भजन मंडळाचा कार्यक्रम दि.११ रोजी
सकाळी १२:०० ते संध्याकाळी ५:०० पर्यंत "श्री." चा महाप्रसादाचा कार्यक्रम मंदीरामधून महिला व पुरुष अशा दोन लाईन बारीमधून वाटप करण्यात येणार असून सर्व भाविक भक्तांनी शांततेने रांगेमधूनच प्रसाद घेऊन सहकार्य करण्याची विनंती संस्थानकडून करण्यांत आली आहे. महाप्रसाद वितरण व्यवस्था जय हनुमान मंडळ वरुड बु. हे करणार आहेत. रात्री ८:०० वाजता ह.भ.प. कु
साक्षीताई लुंगे रा. पारवा यांचे गोड वाणीतुन किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.दि. १२ रोजी सकाळी ९:०० वाजता "श्री."च्या पालखीची मिरवणुक गावामधून दरवर्षीच्या मार्गाने निघुन पोलीस चौकी, दर्गाह चौक, जुने
आठवडी बाजार, कल्याणी चौक, काळा मारोती, पासून मंदिरामध्ये परत येईल दुपारी १२:०० ते ०१:३० श्री.' दहीहांडी व गोपाळकाला ह.भ.प.पांडुरंगजी गावंडे महाराज रा.शेलोडी यांचे मधूर वाणीतून तसेच श्री. संत योगिनाथ बाबा यांचे शुभ हस्ते होणार आहे.पालखी सोहळा मिरवणुकीमध्ये श्री. शारदादेवी महिला वारकरी भजनी मंडळ रा.मसणी श्री. साईनाथ महिला भजनी मंडळ रा.येडशी गोपालकृष्ण महिला
भजनी मंडळ रा.सोनखास, मंगरुळनाथ रेणुकामाता महिला भजनी मंडळ रा शहापुर मंगरुळनाथ शारदा महिला भजनी मंडळ रा शहापुर,मंगरुळनाथ ही मंडळे सहभाग घेणार आहे.दि१५/०२/२०२३ बूधवार ते १६/०२/२०२३ गुरुवार पर्यंत संध्या. ४ ते ७ संस्थानमध्ये विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम आयोजित केले आहे.दि.१७/०२/२०२३ शुक्रवार सकाळी ११:०० वाजता मंदीरात
चित्रऋषी वृध्दाश्रम मंगरुळनाथ येथील वृध्दांना ब्लॅकेट व साहित्य वाटप
करण्यात येणार असून त्यांचेसोबत मुकबधिर निवासी विद्यालय, तुळजापुर येथील विद्यार्थ्यांसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दि. १७/२/२०२३ शूक्रवार सकाळी १०:०० वाजता वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भजनाची भव्य खंजेरी भजन स्पर्धा संत श्री. अच्युंत महाराज भजन स्पर्धा समिती मंगरुळनाथ कडून आयोजित केली असून जवळपास एक लक्षरु.चे वर आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेकरीता श्री. बाळुभाऊ दिवेकर मंगरुळनाथ मोबा.नं.८६०५०५००३६ यांचेशी संपर्क करावा. दि१९/
०२/२०२३ रविवार उर्वरीत भजन स्पर्धेचा कार्यक्रम होणार आहे. कोरोनामुळे मागील २ वर्षे यात्रा न भरल्यामुळे यात्रेकरू पुरुष व महिला भगिनी ची विशेष आवड बघता खानपानाचे नविन प्रकारचे चविष्ठ पदार्थांच्या मेजवानीचे स्टॉल संस्थानने यावर्षी विशेष करून बोलाविलेले आहे. तसेच नेहमी महानगर पालिकेत लागणारे भोईराज अम्युझमेंट पार्क राजुभाऊ रमेश बावने यांना संस्थानने विनंती करून यात्रोत्सवाकरीता मनोरंजनाचे ज्वॉइंट व्हिल, ब्रेकडांन्स, टोराटोरा, ड्रेगन ट्रेन इत्यादी घेवून बोलाविले आहे. वरील आयोजित सर्व कार्यक्रमाकरीता संस्थानला दरवर्षीप्रमाणे सर्व भाविक भक्ता तथा नागरीकांचे सहकार्य लाभत असून संपुर्ण यात्रोत्सवातील धार्मीक सामाजीक तथा यात्रेमधील मनोरंजनाच्या साधनांचा नागरीकांनी शांततेत लाभ घ्यावा असे एका प्रसिद्धी पञकाद्वारे कळविण्यात आले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...