Home / विदर्भ / वाशिम / भरधाव ट्रकने आरोग्य...

विदर्भ    |    वाशिम

भरधाव ट्रकने आरोग्य विभागात कार्यरत महिलेला चिरडले!!* *मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील घटना*

भरधाव ट्रकने आरोग्य विभागात कार्यरत महिलेला चिरडले!!*    *मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील घटना*

*भरधाव ट्रकने आरोग्य विभागात कार्यरत महिलेला चिरडले!!*

 

*मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील घटना*

 

✍️दामोदर जोंधळेकर

   वाशिम

   

*वाशिम:-* अकोला- वाशिम राष्ट्रीय महामार्गावरील मेडशी येथील जिल्हा मध्यवर्ती बँके नजीक एका भरधाव ट्रकने शिला दिलीप  कांबळे वय ५४वर्षे या महिलेला जबर धडक दिली.  यामध्ये सदरहू महिला जागीच ठार झाल्याची घटना आज सोमवार दिनांक 30 जानेवारी2023 रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली.                  प्राप्त माहितीनुसार मेडशी येथील प्राथमिक आरोग्य  वर्धिनी केंद्रामध्ये परिचर या पदावर कार्यरत असलेल्या शिला दिलीप  कांबळे५४हि महिला प्राथमिक आरोग्य केंद्रातुन कामानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जात असताना  समोरून अकोला कडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्र. एम. पी. ०९ एच .जि. ६९६७ या  ट्रकने शिला कांबळे यांना ट्रकच्या चाकाखाली चिरडले . सदरहू अपघातात शिला कांबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला कांबळे ह्या गेल्या पंधरा वर्षां पेक्षा अधिक कालावधी पासून मेडशी आरोग्य वर्धिनी केंद्रात परिचर पदावर कार्यरत होत्या त्यामुळे त्यांचा मेडशी सह परिसरात परिचय होता अत्यंत मनमिळाऊ व संयमी स्वभावाच्या म्हणून त्यांची प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रासह परिसरात ओळख होती त्यांच्या अपघाती निधनाने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत  आहे .शिला कांबळे यांच्या पश्चात चार मुली व एकुलता एक मुलगा व नातवंडे असा परिवार आहे. अपघाता नंतर चालक व ट्रक मालेगाव पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास मालेगाव पोलीस करत आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...