Home / विदर्भ / वाशिम / *शिवसेना जिल्हा प्रमुखपदी*...

विदर्भ    |    वाशिम

*शिवसेना जिल्हा प्रमुखपदी* *डॉ.सुधीर कव्हर यांचीनियुक्ती !*

*शिवसेना जिल्हा प्रमुखपदी*  *डॉ.सुधीर कव्हर यांचीनियुक्ती !*

*शिवसेना जिल्हा प्रमुखपदी*  *डॉ.सुधीर कव्हर यांचीनियुक्ती !*

 

 

*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर* *जोंधळेकर*

 

*वाशिम* : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुधिर कव्हर यांची शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जि.प. अर्थ व बांधकाम सभापती सुरेश मापारी यांच्याकडे जिल्हा समन्वयक पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे. पक्षातर्फे मुंबई येथून या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

डॉ. सुधीर कव्हर यांनी मागील १० वर्षात शिवसेना पक्षावर निष्ठा कायम ठेवुन काम केल्याने वाशिम जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती झाल्याचे बोलले जात आहे. वाशीम पासून जवळच असलेल्या तामसी येथील सुधीर कव्हर रहीवाशी आहेत. वाशीम जिल्हा परीषदेचे गटनेते सुध्दा आहेत. जिल्हा परीषदेचे शिवसेनेचे सहाही सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहीले ह्यापुर्वीसुध्दा सुधीर कव्हर ह्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळलेली असल्याने मागचा अनुभव पाठीशी आहे. जिल्ह्यात सर्वाधीक राजकीय संघर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना व शिवसेनापक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये यापुढे राहणार आहे. पुढे होणाऱ्या नगर पालीका तसेच पूढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका पहाता त्यांचेवर मोठी जबाबदारी पडलेली आहे. देशात सर्वाधीक काळ महीला खासदार म्हणून शिवसेना खासदार भावना गवळीकडे बघीतले जाते तसेच जिल्हयाचे पालकत्व संजय राठोड यांच्याकडे आहे. ह्या दिग्गजांसोबतच भारतीय जनता पार्टीशी संघर्ष करावा लागत असल्याने खरा कसोटीचा काळ डॉ. सुधीर कव्हर यांच्यासाठी यापुढे राहणार आहे. तसेच पक्ष बांधणी करणे सुध्दा महत्वपुर्ण ठरणार आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...