वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
*वाशिम/रिसोड*:- 'शब्दसुमने 'काव्यमंच मंगळवेढा यांच्या वतीने रत्नप्रिया प्रकाशन कडून व विद्या माने संपादित 'काव्यसूमने' हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला होता त्यामध्ये भारत माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा रिसोड येथील शिक्षक धनंजय देशमुख यांच्या दहा कवितांचा समावेश आहे. त्यामध्ये सर तुम्ही, बापू ,कोरोना तू ,मेन्दी, गजरा ,रंग प्रेमाचा, पैसा काळा कसा, मित्र, ती ,बरे नाही, ह्या वेगवेगळ्या विषयावरील त्यांच्या कविता यामध्ये समाविष्ट झाल्या आहेत.प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी माजी खासदार मा. भाऊसाहेब आनंतरावजी देशमुख व बाईसाहेब जयश्रीताई देशमुख युवा नेते नकुल दादा देशमुख यांना हा काव्यसंग्रह भेट देण्यात आला प्रसंगी भाऊसाहेबांनी धनंजय देशमुख यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.
या ग्रंथाच्या काही प्रती भारत मधील शाळेच्या ग्रंथालयातही विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असणार आहेत त्यासाठी शाळेचे ग्रंथपाल मनीष लव्हंडे सह्य करणार आहेत. सोबतच शहरातील वाचनालयाला सुद्धा या ग्रंथाच्या प्रती देण्यात येणार आहे .तरी वाचकांनी व काव्यप्रेमींनी या कवितांचा व इतरही काव्यसंग्रहामधिल समाविष्ट कवितांचा आस्वाद घ्यावा ही अपेक्षा धनंजय देशमुख यांनी प्रसंगी व्यक्त केली. प्राचार्य भांडेकर सरांनी या काव्यसंग्रहचं अवलोकन करतांना अशाच पद्धतीने साहित्य क्षेत्रामध्ये विद्यार्थी -विद्यार्थिनी पुढे यावं ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी मंचावर भारत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका दुबे मॅडम ,भारत माध्यमिक कन्या शाळेच्या मंजुषा देशमुख मॅडम ,व सनराईज इंग्लिश स्कूलचे नवघरे सर विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.काटे सर उपस्थित होते त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक माहुरकर सर व माहूरकर मॅडम, उकळकर मॅडम तसेच अलका रावसाहेब मॅडम या सुद्धा मंच्यावर उपस्थित होत्या यांच मोलाचं सहकार्य आपल्याला मिळालं असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी एन देशमुख यांनी केले.कार्यक्रमासाठी दी आर्य शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षिका ,प्राध्यापक- प्राध्यापिका, व संस्थेतील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...