वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*मानोरा येथे पूर्व आढावा बैठक* *सपन्न*
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर* *जोंधळेकर*
*वाशिम/मानोरा* : ३ डिसेंबर ला नगारा भूमिपूजन करिता ज्या प्रमाणे समाज बांधव उपस्थित होता त्या प्रमाणे १२ फेब्रुवारी ला देशातील बंजारा समाज पांढऱ्या ध्वज खाली एकत्र यावा उमरी व पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र विकास कामाचे भूमिपूजन, सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण व १३५ फूट उंच सेवा ध्वज स्थापणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्व या कार्यक्रमाकरिता यावे म्हणून मी आपल्या पर्यन्त आलो आहे असे मनोगत वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले.
श्रीक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथील ५९३ कोटी रुपये विकास कामाचे भूमिपूजन,१३५ फूट उंच सेवाध्वज स्थापणा व सेवालाल महाराज आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम पूर्व आढावा बैठक कार्यक्रम मानोरा येथील माहेश्वरी भवन येथे माजी जी. प. अध्यक्ष दिलीप जाधव यांचे अध्यक्षते खाली संजय महाराज, माजी जी .प.सदस्य भाऊ नाईक, दिलीप महाराज,प्रेमसिंग राठोड, बाबुसिंग नाईक, डॉ श्याम जाधव, डॉ महेश चव्हाण,सरपंच गोविंद चव्हाण, संजय भानावत, अशोक चव्हाण, डॉ. रामराव राठोड, अरुण जाधव आदी मान्यवर मंचकावर उपस्थित होते पुढे बोलतांना राठोड म्हणाले की लोकशात संख्येला खूप महत्व आहे. आपण सर्व समाज बांधव नगारा भुमीपूजन करिता जमलो म्हणून २५ कोटी विकास कामासाठी मिळाले. ते वाढून १६७ कोटी झाले. त्या प्रमाणे १२ फेब्रुवारी एक दिवस समाजासाठी आपण सर्वांनी दिले. व मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रमाला हजेरी लावली तर विकास कामासोबत समाजाच्या न्याय मागण्या आपल्या पदरात पडणार आहे. यासाठीच आपण महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून पांढरे ध्वज लावून रथ यात्रेला सुरवात केली आहे. समाज राज्यच नव्हे देशातील राजकीय समीकरण बदलवू शकते यासाठी सर्वांनी पांढऱ्या झेंड्या खाली एकत्र येण्याची ही एक संधी आहे. यावेळी बाबुसिंग नाईक, भाऊ नाईक, डॉ श्याम नाईक यांनी आपले विचार व्यास पीठ समोर ठेवले संचलन किशोर चव्हाण यांनी केले आभार डॉ. महेश चव्हाण यांनी मानले यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...