Home / विदर्भ / वाशिम / *शिरपूर येथे श्री विश्वकर्मा...

विदर्भ    |    वाशिम

*शिरपूर येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन*!!

*शिरपूर येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन*!!

*शिरपूर येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सवाचे आयोजन*!!

 

*वाशिम जिल्हा *प्रतिनिधी:दामोदरजोंधळेकर*

 

वाशिम/मालेगांव:- दिनांक १ फेब्रुवारी२०२३ ते ३ फेब्रुवारी२०२३ दरम्यान जयंती महोत्सव होणार साजरा

शिरपूर जैन-शिरपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विश्वकर्मा संस्थान मूळ देवस्थान येथे श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव साजरा होत आहे.१ ते ३ फेब्रुवारी दरम्यान ह्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 श्री विश्वकर्मा संस्थान मूळ देवस्थान शिरपूर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री चा महोत्सव साजरा होत आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि १ फेब्रुवारी रोजी सकाळी धर्म ध्वजारोहण जनार्दन पंत उद्धवराव रत्नपारखी अध्यक्ष विश्वकर्मा संस्थान शिरपूर व श्रीकांत अरुणराव साखरकर अध्यक्ष विश्वकर्मा जयंती उत्सव समिती यांचे शुभ हस्ते होत असून   श्री विश्वकर्मा प्रभू व संत पदमाजी महाराजांचा अभिषेक व पूजा होईल, २ फेब्रुवारी रोजी सकाळी कलश यात्रा त्यानंतर गायत्री महायज्ञ, श्री विश्वकर्मा यज्ञ सुरू होईल यावेळी यज्ञ पुरोहित म्हणून पुरुषोत्तम जी दुरतकर व गायत्री परिवार वाशिम हे राहतील, तर ता ३ फेब्रुवारी रोजी सकाळी गायत्री यज्ञ हवन व पूर्णाहुती त्या नंतर श्री विश्वकर्मा प्रभूची पालखी मिरवणूक व श्री जन्मोत्सव सोहळा होईल त्यानंतर  समाज मेळावा व दुपारी महाप्रसादास सुरुवात होईल.या महोत्सवा दरम्यान दररोज सकाळी श्री विश्वकर्मा महापुराण वाचन ह भ प श्री गजानन तुळशीरामजी मुगवानकर यांच्याकडून करण्यात येणार आहे.कोरोना काळानंतर प्रथमच श्री विश्वकर्मा महोत्सव मोठया प्रमाणात साजरा होत असून या सर्व कार्यक्रमांचे नियोजन अध्यक्ष व विश्वस्त समिती श्री विश्वकर्मा संस्थान शिरपूर व श्री विश्वकर्मा जयंती महोत्सव आयोजन समिती कडून करण्यात येणार आहे.तरी भाविकांनी व विश्वकर्मीय बांधवानी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन एका पत्रकाद्वारे महोत्सव समितीकडून करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...