वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*तहसील कार्यालय रिसोड येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा*!!
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
वाशिम/रिसोड :- नागरिकांमध्ये मतदानाविषयी व नवमतदार यांची नोंदणी याबाबत प्रचार होऊन जास्तीत जास्त लोकांनी आपला मतदानाचा अधिकार बजावावा याबाबत जागृती होण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी मा.भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. त्यानुसार आज दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी तेरावा राष्ट्रीय मतदार दिवस तहसील कार्यालय रिसोड येथे उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला." नथिंग लाईक वोटिंग, आय वोट फॉर शुअर "अशी यावर्षीच्या मतदार दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती. त्या अनुषंगाने स्व. पुष्पा देवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, रिसोड व उत्तमचंद बगडिया महाविद्यालय, रिसोड श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड व तहसील कार्यालय रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय रिसोड येथे रांगोळी स्पर्धा, कलापथक सादरीकरण, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, व्हिडिओ तयार करणे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये 42 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मा. तहसीलदार अजित शेलार सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी मतदार दिनानिमित्त कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी शपथ घेतली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तहसीलदार रिसोड तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी, 033 रिसोड, अजित शेलार यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून वाय.डी.कोईनकर मा. दिवाणी न्यायाधीश दिवाणी न्यायालय, रिसोड तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, रिसोड उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री संतोष बोडके यांनी व प्रास्ताविक प्रा. अतुल घोटे यांनी, तर आभार प्रदर्शन लक्ष्मण बनसोडे, निवासी नायब तहसीलदार रिसोड यांनी केले. सदर कार्यक्रमाला स्पर्धेतील सहभागी स्पर्धक महसूल सहाय्यक संदीप काळबांडे, महसूल सहाय्यक प्रताप काळे, प्रा. अतुल खोटे सर, प्रा. अमोल अढाव सर ,प्रा.कु. पल्लवी देशमुख मॅडम, प्रा. केशव कोकाटे सर ,प्रा. कु. आम्रपाली भगत मॅडम, विष्णू टोंचर व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...