संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर*
वाशिम : शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आज दि. २४.जानेवारी २०२३ रोजी मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विजय काळबांडे यांच्या अध्यक्षेतेखाली राष्ट्रीय बालीका दिनानिमित्त मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमास अति. जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. धर्मपाल खेळकर, डॉ चंद्रकांत यादव, वैद्यकिय अधिक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय डॉ. किशोर लोनकर, वैद्यकिय अधिकारी, डॉ. मसारे यांच्या हस्ते स्त्री जन्माचे स्वागत करण्याकरिता नवजात बालीकांना ड्रेस व मातांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच सहायक अधिसेविका, श्रीमती. रेखा घुले, यांनी मुलींच्या जन्माच्या स्वागताकरिता मातांना मार्गदर्शन करुन प्रोत्साहित केले. तसेच ऍड. राधा नरवलिया यांनी मुलींच्या जन्माचे व शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. तसेच पीसीपीएनडटी कायदयाच्या कडक अंमलबजावणी करीता बक्षिस योजनेबाबत उपस्थित सर्व माता रुग्णांना माहिती दिली. त्याबरोबर बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रमांअंतर्गत अनधिकृत गर्भपात, गर्भलिंग तपासणीबाबत तक्रार असल्यास पीसीपीएनडिटी कार्यक्रमांअतर्गत टोल फ्रि नं. १८००२३३४४७५, तसेच मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार ८४५९८१४०६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, सदरील माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल याबाबत माहिती सांगितली.अधिपरिचारिका, श्रीमती. ललिता घुगे, परिसेविका, श्रीमती. आशा राठोड, परिसेविका, श्रीमती लिना साबळे, परिसेविका, श्रीमती. लतिका ऊईके, अधिपरिचारिका , अमेर सय्यद, अधिपरिचारिका, श्री. विश्वजित, अधिपरिचारिका , श्री वैभव मस्के, अधिपरिचारिका, रोशनी देशमुख व श्री. ओम राऊत, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सर्व अधिकारी व कर्मचारी सदरील कार्यक्रमास उपस्थित होते.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...