वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
Reg No. MH-36-0010493
*स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०२३ अंतर्गत उपक्रम*
*वाशिम जिल्हा प्रतिनिधी:दामोदर जोंधळेकर*
वाशिम:दि २४.०१.२०२३ रोजी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण २०२३ अंतर्गत जिल्हा परिषद परिसरात आज स्वच्छता श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सकाळी ७.३० ते ९.३० या वेळात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा परिषदेचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या वतीने सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग घेतला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करुन मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांनी सर्व गावांनी आपल्या गावात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखावी असा संदेश दिला आहे. या उपक्रमात जिल्हा परिषदेतील विविध विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी मुख्य वित्त व लेखाधिकारी दिनकर जाधव, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सपकाळे, पशु संवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखडे, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक गजानन वेले, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, उप मुख्य वित्त व लेखाधिकारी तुषार मोरे, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण मापारी, कृषी अधिकारी बंडगर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
*...तर ५०० रुपये दंड!*
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण 2023 अंतर्गत स्वच्छता श्रमदान उपक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम व इतर विभाग प्रमुख सहभागी झाले होते. दरम्यान स्वच्छता अभियान राबवतांना परिसरात वापरलेल्या गुटखा पुड्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात दिसत होता. ही बाब निकम यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या निदर्शनास आणुन दिली. याची गंभीर दखल सिईओ पंत यांनी घेतली. यापुढे जिल्हा परिषद परिसरात व कार्यालयात कुणीही गुटखा पुडी खातांना, धुम्रपान करतांना व थुंकतांना आढळुन आल्यास अथवा सीसीटीव्ही मध्ये दिसल्यास अशा व्यक्तिंना ५०० रुपये दंड आकारण्याचे निर्देश त्यांनी दिले. अशी कृती करणारा शासकीय कर्मचारी असल्यास त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देशही पंत यांनी दिले.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...
धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...
*पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा पत्रकार कडून जाहीर निषेध.. निषेध !!* पत्रकारावर हल्ला करनार्यावर कारवाई करण्याची...