Home / विदर्भ / वाशिम / *प.पू.नारायण महाराज ज्ञान...

विदर्भ    |    वाशिम

*प.पू.नारायण महाराज ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम* !!

*प.पू.नारायण महाराज ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम* !!

*प.पू.नारायण महाराज ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम* !!

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी: दामोदर जोंधळेकर

 

कारंजा ( लाड):विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या दृष्टीने भिलखेडा कारंजा येथील परमपूज्य नारायण महाराज ज्ञान मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  20 आणि 21 जानेवारी असे दोन दिवस आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन 20 जानेवारी रोजी वाशिम जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती अशोकराव डोंगरदिवे यांनी केले.माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्याध्यापक विजय नागवानी,कारंजा नगरपरिषदेचे माजी शिक्षण सभापती अविनाश दहातोंडे, डॉ. अविश दरेकार व संस्थेचे अध्यक्ष बाबारावजी नेमाने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध स्पर्धा आणि खेळ व अन्य अनुषंगिक कार्यक्रम घेण्यात आले.या सर्व कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी बहुसंख्येने सहभागी होऊन प्रतिसाद दिला.शाळेचे सचिव संजय बाबारावजी नेमाने आणि मुख्याध्यापिका कुमारी गायत्री संजयराव नेमाने यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमातील विविध स्पर्धा आणि खेळांमध्ये सहभागी होऊन विजयी ठरलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला संस्थेचे सचिव संजय बाबारावजी नेमाने, यावर्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड व पंकज महाराज पवार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका तृप्ती उखळकर यांनी केले तर शिक्षिका अश्विनी पंडित यांनी आभार मानले.दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी  कारंजा येथील सूतगिरणीचे अध्यक्ष सुनील पाटील धाबेकर, वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ वैशालीताई प्रमोद लडे, वढवी येथील अप्पास्वामी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेंडोकार, धनज येथील तारांगण इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष उदयराव इंगळे यांनी भेट देऊन या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे कौतुक केले.

जे विद्यार्थी स्पर्धा आणि खेळांमध्ये विजय ठरले त्यांची स्पर्धा व खेळनिहाय नावे पुढीलप्रमाणे आहेत.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि त्याच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक सुधीर पाटील, निखिल घुगे, विकी शिरसाट, शिक्षिका राखी जिचकार,कविता देशमुख, सोनाली शाहाकार, वैष्णवी लव्हाळे, शिल्पा कथे, वैष्णवी हजारे, प्रिया लडे, मुस्कान नंदावाले,विशाखा रेडगे, दिपाली कदम, सायली गायकवाड,तृप्ती उखळकर, अश्विनी पंडित, शिवानी गोंडाळ,  शिक्षकेतर कर्मचारी आरती राजेधर, पल्लवी धेंगाळे यांचे सह शिक्षक शिक्षिका नी सुद्धा स्पर्धेत भाग घेतला.

ताज्या बातम्या

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव. 23 November, 2024

वणी विधानसभेत संजय देरकर यांचा बहुमताने विजय, बोदकूरवार यांचा पराभव.

वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी. 23 November, 2024

सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.

वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी 23 November, 2024

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात आज मतमोजणी

यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 22 November, 2024

युवा सेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

...

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वाशिमतील बातम्या

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची नियुक्ती !!*

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या कारंजा मानोरा विधानसभा अध्यक्ष पदी दामोदर जोंधळेकर यांची...

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!!

धनज बु.येथील आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका देण्याची मागणीजिल्हाधिकारी यांच्या दालनात चर्चा करून निवेदन!! *वाशिम...