अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
???? मा. नागो गाणार यांच्या प्रचार सभेला गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड प्रतिसाद????
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
गडचिरोली:--दिनांक 17जानेवारी 2023 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली येथील धर्मराव कृषी विद्यालय अहेरी, येथे शिक्षक मतदार बंधू भगिनींना निवडणूक प्रचारादरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजे अंब्रिशराव महाराज यांनी आपल्या प्रमुख मार्गदर्शनात माननीय गाणार सर यांच्या कार्याबद्दल उपस्थित शिक्षक बंधू भगिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात मा.गाणार सरांसारखे अभ्यासू, शिक्षकी पेशेतून आलेले व साधी राहणीमान आणि उत्तम नेतृत्व क्षमता असलेले उमेदवार असणे व त्यांना निवडून आणून विधान परिषदेत पाठविणे काळाची गरज असल्याचे सांगितले. उपस्थितीत नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत आणि भारतीय जनता पार्टी आणि आर पि आइ(आठवले) समर्थन असणारे उमेदवार मा. नागो पुंडलिक गाणार सर यांच्या प्रचारार्थ गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मतदार शिक्षक बंधू-भगिनींना मा. नागो गाणार यांनी मागील 12 वर्षात शिक्षण क्षेत्रातील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्येबाबत जुनी पेन्शन योजने ची शासन दरबारी खरी परिस्थिती व धोरण, विनाअनुदानित च्या 20% 40% 60% टक्के जीआर बद्दल, 10,20,30 ची आस्वासित प्रगती योजना, पदोन्नती, सातव्या वेतन आयोग, शिक्षकांचे 1 तारखेला वेतन होणे, डीसीपीएस च्या पावत्या, शिक्षक भरती, सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा,तिसरा हप्ता थकबाकी, बीडीएस प्रणाली बंद मुळे प्रलंबित देयके बाबत.अशा शिक्षण क्षेत्रातील विविध समस्ये विषयी मार्गदर्शन करून सभेला जवळपास 250 उपस्थित मतदार शिक्षक बंधू भगिनींशी संवाद साधला.
तसेच जिल्हा संयोजक श्री संतोष सुरावार सर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शिक्षण विभागातील प्रत्येक समस्या सोडविण्यात माननीय गाणार सरांद्वारे मोठ्या आत्मीयतेने अधिकारी, प्रशासन व शासन दरबारी तात्काळ पत्राचार करून सहकार्य केल्यामुळे समस्या तात्काळ सोडविण्यात येते.त्यामुळे शिक्षक बंधू भगिनींंमध्ये संघटने विषयी विश्वासाची भावना वृद्धिंगत झाली.
प्रचार सभेला जिल्हाध्यक्ष श्री संतोष सुरावार, नागपूर कार्यालय मंत्री श्री मेहेरे सर, राज्य उपाध्यक्ष श्री अविनाश तालापल्लीवार, जिल्हा कार्यवाह प्राथमिक विभाग श्री संतोष जोशी सर,चामोर्शी तालुका कार्यवाह श्री तायडे, श्री गिरिष मद्देर्लावार तालुकाध्यक्ष अहेरी, क्रिष्णा मंचर्लावार कार्यवाह, आतिश दोंतुलवार, प्रणय येगलापवार, सोनल बंडावर, दिनेश ठिकरे, खंडाळे सर, अभय भोयर, भरतकर सर, चौधरी सर,मुकेश गोंगले तालुका अहेरी सभेला उपस्थित होते.
या प्रचार दौऱ्या प्रसंगी जवळपास 250 मतदार शिक्षक बंधू-भगिनींसोबत संवाद साधण्यात आला.आणि होऊ घातलेल्या शिक्षक आमदार निवडणुकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रामाणिक, निस्वार्थ, शिक्षक समस्येची जाणीव असणारे, अभ्यासु,शिक्षक प्रेमी, अधिकृत उमेदवार माननीय गाणार नागो पुंडलिक-1 यांच्या केलेल्या कार्याच्या आधारावर समर्थन मागून पहिल्या पसंतीचे क्रमांक देऊन प्रचंड बहुमताने विजयी करण्याची विनंती करण्यात आली.
या प्रचार सभेला अहेरी तालुका तथा संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून मतदार शिक्षक बंधू- भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...