Home / विदर्भ / गडचिरोली / ⭐गुंतवणुकीवर मिळणाऱ्या...

विदर्भ    |    गडचिरोली

⭐गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर नाही⭐ ❄पुणे खंडपीठाचा निर्णय❄

⭐गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर नाही⭐    ❄पुणे खंडपीठाचा निर्णय❄

⭐गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर नाही⭐

 

❄पुणे खंडपीठाचा निर्णय❄

 

 ✍️मुनिश्वर बोरकर

    गडचिरोली

 

 

 गडचिरोली:--सहकारी पतसंस्थांना आता बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर यापुढे प्राप्तिकर द्यावा लागणार नाही असा निर्णय प्राप्तिकर अपलीय प्राधिकरणाच्या पुणे खंडपीठाने नुकताच दिला असून या निर्णयामुळे राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना दिलासा मिळणार असल्याचे सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर यांनी सांगितले आहे.

    महाराष्ट्रातील 23 पतसंस्थांनी 2017- 18 चे प्राप्तेकर विवरण पत्र भरताना गुंतवणुकीवरील व्याजावर प्राप्तिकरातून सूट मागितली होती. प्राप्तिकर कायदा 80 पी अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांमधील गुंतवणुकीवर व्याज करमुक्त आहे, मात्र प्राप्तिकर विभागाच्या मुख्य आयुक्तांनी शासनाचा महसूल बुडवला जातोय  असे सांगत पतसंस्थांनी गुंतवणुकीवरील व्याजावर प्राप्तिकर भरलाच पाहिजे असा आदेश दिला होता, त्यासाठी त्यांनी प्राप्तिकर कलम 263 चा दाखला दिला होता. या अन्यायविरुद्ध पतसंस्थांनी प्राप्तिकर अपिलीय प्राधिकरणाच्या पुणे खंडपीठाकडे दाद मागितली होती त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्वात आवाज उठविला होता. पुणे खंडपीठाच्या या निर्णयामुळे पतसंस्थांच्या लढ्याला यश आले असून पतसंस्थांकडे असलेल्या सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीचा हा विजय असल्याची भावना राज्यभरातील पतसंस्था व्यक्त करीत आहे.

   प्राप्तिकर विरोधातली एक मागणी पूर्ण झाली असली तरी दुसरी मागणी अजून प्रलंबित आहे ती म्हणजे पतसंस्थांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या उत्पन्नावर प्राप्तिकर सवलत मिळाली पाहिजे. सेक्शन 194 प्रमाणे एक कोटी रुपयांच्या पुढे रक्कम बँकेतून काढल्यास त्यावर एक ते दोन टक्के टीडीएस कापल्या जातो पतसंस्थांना प्राप्तिकर माफी असेल तर टीडीएस कापण्याचे कारण काय  यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचा लढा सुरूच राहणार असून यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडे (सीबीटीडी) दाद मागणार असल्याचे  राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सांगितले आहे.

     सहकारी पतसंस्थांनी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावर प्राप्तिकर माफी मिळाल्याबद्दल विदर्भ पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, गडचिरोली जिल्हाध्यक्ष दिलीप खेवले तसेच मानद सचिव व सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर  यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांनी पुणे खंडपीठाचे  आभार मानले आहे.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...