अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
Reg No. MH-36-0010493
*सरकार विविध वस्तूंवर कर लादून व मोठ्या प्रमाणावर महागाई वाढवून आपल्याकडून किती रुपये काढून घेते व आपल्याला काय व किती देते याचा हिशेब करायला पाहिजे-- डॉ. नामदेव किरसान.*
गडचिरोली
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली:- दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी मौजा वसा तालुका गडचिरोली येथे "टिळा कुंकवाचा" या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी अमर्याद वाढती महागाई, स्वयंपाकाच्या गॅस रिफिलिंगच्या वाढलेल्या तीन पट किमती, शेतकऱ्यांना लागणाऱ्या खताच्या किंमतीत झालेली दुप्पट वाढ व पाच किलो वजन कमी, जीवनावश्यक वस्तूंवर व दररोजच्या जेवणातील वस्तूंवर जीएसटी च्या रूपाने आकारलेले कर, डिझेल पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा वाढलेला मशागतीच्या खर्च, खाद्यतेलांच्या किंमतीत दुप्पट वाढ, बांधकाम साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ इत्यादींच्या रूपाने सरकार शेतकऱ्यांकडून व जनतेकडून पैसे काढून घेण्याचे काम करीत असून त्यांना मात्र तुटपुंजी मदत करून मेहरबानी करीत असल्याची जाणीव करून देत आहे. करिता जनतेने सतर्क राहून सरकार आपल्याला काय देते व आपल्याकडून काय काढून घेते याची जाणीव सर्वांनी ठेवायला पाहिजे. या सर्व बाबींचा विचार केला तर सरकार आपल्याला जे देते त्यापेक्षा दुप्पटीने आपल्याकडून वसूल करून घेत असल्याचे दिसून येईल, असे मोठ्या प्रमाणावर उपस्थित प्रेक्षक जनसमुदायास संबोधून अवगत केले.
याप्रसंगी नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनसोहळ्याचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, उद्घाटक माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रदेश सचिव डॉक्टर नितीन कोडवते, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेट्टी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून अनुजा जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोरघरे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, शिक्षक सेलचे अध्यक्ष सोनटक्के जी, कामगार सेल अध्यक्ष दामदेवजी मंडलवार, गडचिरोली काँग्रेस शहर अध्यक्ष सतीशजी विधाते, काँग्रेस उपाध्यक्ष अनिलजी कोठारे, काँग्रेस नेते अब्दुलभाई पंजवानी, मुखरुजी पाटील झोडगे, यशवंता बाई गेडाम, मनोहर जी नवघडे, संतोषजी चिंचोरकर, मुद्दमवार जी, अंकुशजी इंगळे, जितु भाऊ मुनघाटे, दादाजी दशमुखे, नेताजी पाटील झोडगे, मिराबाई शेंडे, उपसरपंच वर्षाताई बावनवाडे, ग्राप सदस्य मंगलाताई भोयर, शिवाजी नेताम, वैशालीताई सेलोटे, पिंगलाताई शिवणकर, दादाजी देशमुख व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...