Home / विदर्भ / गडचिरोली / चवदार तळ्याचा सत्याग्रह...

विदर्भ    |    गडचिरोली

चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे समतेसाठीचा लढा होय दिलीप टिपणीस यांचे प्रतिपादन

चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे समतेसाठीचा लढा होय          दिलीप टिपणीस यांचे प्रतिपादन

चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे समतेसाठीचा लढा होय

        दिलीप टिपणीस यांचे प्रतिपादन

 

   गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर

 

      गडचिरोली :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेसाठी अनेक लढे उभारले. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा,  पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून अहिंसक मार्गाने आंदोलने उभारली. 20 मार्च 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला.  त्या तळ्याचे पाणी प्रथम डॉ. आंबेडकरांनी प्यायले आणि हजारो अस्पृश्य लोकांनी त्यांचे अनुकरण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा लढा म्हणजे समतेसाठीचा लढा होय असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी व महाड मुक्तिसंग्रामाचे प्रमुख नेते सुरबा नाना टिपणीस यांचे नातू दिलीप टिपणीस यांनी केले.

      स्थानिक सम्यक बुद्ध विहार गोकुळ नगर येथे  "क्रांती चवदार तळ्याची"  या विषयावर व्याख्यान करताना ते बोलत होते.

       भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा, सम्यक जेष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, विशाखा महिला मंडळ  तसेच सम्यक समाज समिती यांच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रोहिदास राऊत तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर येथील श्रीराम बनसोड, डॉ. एम. ए. रायपुरे, केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य धर्माजी बांबोळे, सरचिटणीस प्रा. गौतम डांगे, विनोद निंभोरकर,  एम. यु.  तितरे  उपस्थित होते.

     पुढे बोलताना दिलीप  टिपणीस म्हणाले की,  विषमतेवर आधारित असलेल्या मनुस्मृतीचे 25 डिसेंबर 1927 रोजी डॉ.आंबेडकर यांनी जाहीर दहन केले तसेच संविधानाच्या माध्यमातून सर्वांना समानतेचे अधिकार दिले.

       सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर,  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना  माल्यार्पण करून त्रिशरण पंचशील घेण्यात आले.

    श्रीराम बनसोड म्हणाले की, महाड येथील क्रांती स्तंभ हा स्वाभिमानाचे प्रतीक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान शिकविला.  बुद्धाचा विज्ञानवादी धम्म दिला म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.

     चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणजे सामाजिक चळवळीला दिशा देणारे एक अहिंसक आंदोलन होय.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे प्रत्येकाला प्रेरणादायी आहे प्रतिपादन अध्यक्ष पदावरून बोलताना रोहिदास राऊत यांनी केले.

    मिलिंद टिपणीस तसेच श्रीराम बनसोड यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन याप्रसंगी सत्कार करण्यात आला.

      ज्येष्ठ नागरिक नागरिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कडूजी उंदीरवाडे ,विशाखा महिला मंडळ अध्यक्षा सुमित्रा राऊत, सम्यक समाज समितीचे अध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, भारतीय बौद्ध महासभेचे शहर अध्यक्ष बाळकृष्ण बांबोळे, तसेच साखरा, अडपल्ली, गोगाव,गडचिरोली येथील बौद्ध समाजाचे उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे संचालन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलाराम राऊत यांनी केले. सरचिटणीस प्रा. गौतम डांगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

     कार्यक्रम यशस्वी करण्यात  कोषाध्यक्ष मोरेश्वर अंबादे,कालिदास राऊत,उपाध्यक्ष लहू रामटेके, शहराध्यक्ष बाळकृष्ण बांबोळे, सुरेखा बारसागडे, मनीषा  वारके,अरुणा राऊत इत्यादींनी सहकार्य केले.

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...