Home / विदर्भ / गडचिरोली / तथागत भगवान बुद्धाचा...

विदर्भ    |    गडचिरोली

तथागत भगवान बुद्धाचा धम्म सुखी व शांतीपूर्ण जीवन जगण्याची शैली-गगन मलिक

तथागत भगवान बुद्धाचा धम्म सुखी व शांतीपूर्ण जीवन जगण्याची शैली-गगन मलिक

तथागत भगवान बुद्धाचा धम्म सुखी व शांतीपूर्ण जीवन जगण्याची शैली-गगन मलिक

 

   गडचिरोली

✍️मुनिश्वर बोरकर

 

गडचिरोली:--मी सध्या देशभरात बुद्धाच्या मूर्तींचे वितरण करत आहे. मात्र मला फक्त मूर्ती नाही, तर तथागत बुद्ध घराघरांत पोहोचवायचा आहे, अशी माहिती सिने अभिनेते तथा धम्म प्रचारक गगन मलिक यांनी दिली.

भीमा-कोरेगाव शौर्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यात

आल्यानंतर दुसऱ्या  दिवशी सोमवार (ता. २) स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझा जन्म हिंदू धर्मात झाला. पुढे अभिनय क्षेत्रात आल्यावर मी टीव्ही मालिकांमध्ये प्रभू श्रीरामचंद्राची भूमिका केली. इतरही अनेक भूमिका केल्या. मात्र, श्रीलंकेत निर्माण झालेल्या सिरी सिद्धार्थ गौतम या चित्रपटात भगवान बुद्धाची भूमिका साकारताना मी बौद्ध धम्माविषयी प्रचंड वाचन केले. बुद्धाच्या विचारांनी इतका प्रभावित झालो की, आपण धम्म स्वीकारायचा आणि धम्म प्रचारासाठी वाहून घ्यायचे, असा संकल्पच केला. पुढे २०१४ मध्ये बुद्धाचा धम्म स्वीकारला. १०० दिवस श्रामणेर भिख्खू म्हणूनही मी धम्माचे अध्ययन करून अनुभव घेतला. एकेकाळी भारत ही बुद्धभूमी होती. पुढे हा धम्म नष्ट झाला. पण, आज भारतात जो काही बुद्ध धम्म दिसतो त्याचे संर्पूण श्रेय विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आहे. म्हणून जगभरातील बौद्ध राष्ट्रांचे अनुयायी भारतात येतात तेव्हा ते बुद्धगया व इतर बौद्ध स्थळांना भेटी देतात. त्यावेळेस मी त्यांना दीक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबांच्या कार्यापुढे नतमस्तक होण्यास सांगतो. आम्ही गगन मलिक फाउंडेशनच्या माध्यमातून देशभरात बुद्ध मूर्तीचे वितरण करत आहोत. त्यासोबतच बुद्धविचारांचा प्रचार, प्रसार करत असतो. आपल्या देशात बौद्धांचा एक महासंघ निर्माण करून महानायक निवडायचा आहे. त्या माध्यमातून जगभरातील बौद्ध राष्ट्रांशी येथील बौद्धांना जोडता येईल. तसेच १७ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान परभणीपासून चैत्यभूमीपर्यंत १०० भिख्खूंची पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेदरम्यान इतरही भिख्खू, उपासक, उपासिका जुळत जातील. मी अभिनय क्षेत्रात अजूनही आहे. पण, आता माझी जी प्रतिमा लोकमानसात आहे त्याला विसंगत भूमिका करणार नाही. चांगल्या भूमिका मिळाल्यानंतर अभिनय क्षेत्रात नक्कीच काम करत राहील, असेही ते म्हणाले. तसेच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हस्तक आहे, असे जे आरोप होतात ते सपशेल चुकीचे असून बुद्धाच्या विचारांनी प्रभावित होऊन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जाणून घेत मी या वाटेवर आलो आहे. मी आता याच वाटेवर मार्गक्रमण करणार आहे, असेही ते म्हणाले.

आपण जगभरात बुद्धाच्या धम्मासोबतच हा धम्म भारतात पुनरुज्जीवित करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याबद्दल सांगत असतो. त्यामुळे आता व्हिएतनाम देशात बाबासाहेबांच्या दहा मूर्ती स्थापन होणार आहेत. तसेच थायलंड येथे २९ जानेवारी रोजी बाबासाहेबांच्या मूर्तीचे अनावरण होणार असल्याची माहिती गगन मलिक यांनी दिली. तसेच धम्म प्रचार, प्रसार, गुणवंत विद्यार्थ्यांना धम्म प्रशिक्षण, वृद्ध भिख्खूंची काळजी घेण्यासाठी वृद्धाश्रम निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपल्यावर थायलंडमध्ये माहितीपट तयार होणार असून तो ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होईल. तसेच सम्राट अशोकाच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मितीचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले

पत्रकार परिषेदला अँड. विनय बांबोळे प्रा, मुनिश्वर बोरकर गोपाल रायपूरे दिलीप गावर्धन  अर्पना खेवले आदी हजर होते .

ताज्या बातम्या

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

गडचिरोलीतील बातम्या

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे*

*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश*

*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...

*चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार जाहीर.*

गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...