Home / विदर्भ / अकोला / अधिष्ठाता डॉ मीनाक्षी...

विदर्भ    |    अकोला

अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा - - उमेश इंगळे

अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा - - उमेश इंगळे

 

 

                अकोला प्रती - शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांची हकालपट्टी करा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी मा. संचालक वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे

शासकिय वैद्यकिय महाविद्यालय चे अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये मॅडम यांचा भोंगळ कारभार दिवसां न दिवस वाढत असून रुग्णांचे व इंनटर्न डॉक्टर चे हाल सुरू आहेत. आज १० दिवस झाले वार्डामध्ये डॉक्टरच्या हॉस्टेल मध्ये पाणी नाही, सर्वोउपचार रुग्णालयात पाहीजे तसा औषधी चा साठा उपलब्ध नाही रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागते, रुग्णांच्या रक्ततपासणी करिता खासगी लॅब वाले बोलाऊन पैसे घेतले जातात तरी संबंधित डॉक्टर वर कोणत्याच प्रकारची कारवाई नाही, सौ मनिषा उमेश चव्हाण या महिलेचे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया अपयशी करणाऱ्या व रुग्णांशी उद्धटपणे वागणाऱ्या डॉ श्यामकुमार सिरसाम सारख्या बोगस डॉक्टर यांना पाठीशी घालण्याचे काम होत आहे त्याला कारणीभूत अधिष्ठाता गजभिये आहेत.  

      ओपीडी मधील डॉक्टर 9 ची वेळ असून सुद्धा 11 ते 12 च्या दरम्यान येतात. त्याचे कारण असे की सगळ्या डॉक्टर चे खाजगी हॉस्पिटल असल्या मुळे त्यांना त्यांचे पेशंट काढून सरकारी हॉस्पिटल उशिरा आले तरी चालेल, कारण आपल्याला बोलणारे अधिष्ठाता गजभिये यांना म्यानेज केले असे दिसून येत आहेत कीवां त्यांचं लक्ष नाही असा अर्थ काढू शकतो.

       तसेच अधिष्ठाता मॅडम हे वॉर्ड मध्ये राऊंड घेत नाही, वार्डात जागोजागी घाण साचलेली आहे.तसेच हॉस्पिटल परिसरात फेरफटका मारत नाही, ए.सी च्या गाडीने येतात व ए.सी. च्या ऑफिस मध्ये डॉक्टरला बोलून आपलं काम करतात.त्यांना रुग्णासंबधित वॉट्स अप वर मॅसेज केले तरी त्यांचा काहीच रिप्लाय देत नाही त्या मुळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना च्या वतीने आपल्याला विनंती करण्यात येते की डॉ मीनाक्षी गजभिये मॅडम यांची तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन, धरणे, उपोषण करण्यात येईल यांची गंभीर दखल सरकारनी घेण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी प्रा संजय खडसे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे  यावेळी सामाजिक कार्यकर्ता ॲड रोशन तायडे, विशाल भोसले, चंद्रविर तेलगोटे, पिडित महिलेचे पती उमेश चव्हाण उपस्थित होते

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...