Home / विदर्भ / अकोला / रुग्णालयातील मेडिकलमधुनच...

विदर्भ    |    अकोला

रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही - उमेश इंगळे*

रुग्णालयातील मेडिकलमधुनच औषध घेणे बंधनकारक नाही - उमेश इंगळे*

*

 

अकोला प्रती - रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी येथील मेडिकल स्टोअर्स मधूनच औषध खरेदी करणे सक्तीचे नाही असा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे त्यामुळे याबाबत लवकरच रुग्णाच्या हक्कासाठी काय करता येईल याबाबत महाराष्ट्रातील सेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे अशी माहिती उमेश इंगळे यांनी दिली आहे कोणताही रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल असताना तेथील औषधी दुकानातूनच औषध घेण्याची सक्ती रुग्णालयाकडून केली जाते यामुळे अनेक तक्रारी वाढल्या होत्या त्याची दखल घेत अन्न आणि औषध प्रशासनाने ही सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे मात्र त्याआधी रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांमधून औषध खरेदीची सक्ती करत अनेकांनी फलक लावणे बंधनकारक समजले नव्हते त्यामुळे बाहेरील एखाद्या औषध विक्रेत्याकडे कमी किमतीतील उपलब्ध असलेले हीच औषधे येथे चढ्या भावात विकत घ्यावी लागत होती त्यावर आता उपाय शोधत रुग्णालयाशी संलग्न असलेल्या औषध दुकानातूनच औषध खरेदी करणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला असल्याची माहिती रुग्णसेवक संघटनेचे महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिली दरम्यान आता या निर्णयामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासा मिळणार असून औषधे आणि औषध आणी सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अन्वये अन्न आणि औषध प्रशासन (एफ डी ए )कडून याबाबतचे आदेश प्रस्तुत करण्यात आले आहेत तरी या निर्णयाबाबत सर्व रुग्णालय आणि नर्सिंग होम यांना असे फलक लावणे आता बंधनकारक होणार आहे कोणत्याही नोंदणीकृत औषध विक्रेत्यांकडून रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय औषध खरेदी करू शकतात यासाठी रुग्णाला किंवा त्यांचा कुटुंबीयांना अडचण येत असेल तर प्रथम पोलिसांना कॉल करा अन्यथा याबाबतीत आम्हाला संपर्क करून लेखी माहिती द्यावी अशी मागणी उमेश इंगळे यांनी केली आहे रुग्णालयाची संलग्न औषध दुकानातूनच औषधी खरेदी करणे बंधनकारक नाही असा उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावे. याकरिता महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी अकोल्यातील हॉस्पिटलमध्ये शासनाच्या आदेशासह पत्र देऊन मागणी केली आहे औषध दुकानातूनच औषधाची खरेदी करणे बंधनकारक नाही असा उल्लेख असलेले फलक रुग्णालयांनी ताबडतोब दर्शनी भागात लावावे अन्यथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र शासनाकडे सदर हॉस्पिटल वर कारवाई करण्याकरिता मागणी करेल अशी माहिती उमेश सुरेशराव इंगळे यांनी दिली आहे

ताज्या बातम्या

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन. 22 December, 2024

वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.

वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा. 22 December, 2024

अपंग विद्यार्थ्यानां स्वेटरचे वाटप करून फाल्गुन गोहोकार यांनी केला वाढदिवस साजरा.

वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...