वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
Reg No. MH-36-0010493
मुनिश्वर बोरकर (गडचिरोली): नेहमी सेवा कार्यात जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब गडचिरोलीने जिल्हा स्काऊट गाईड संस्थेला ताडपत्रींची गरज ओळखून 15 ताडपत्री नुकत्याच एका कार्यक्रमात भेट दिल्या.
११० वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, चारित्र्यसंवर्धन, आरोग्य, खिलाडी वृत्ती व सेवाभाव निर्माण करून देशांचे उत्तम नागरिक घडवण्याचे काम करणाऱ्या स्काऊट गाईड संस्थेला अत्यल्प अनुदानामुळे जिल्हा मिळावे व शिक्षक प्रशिक्षणे घेताना तारेची कसरत करावी लागताना दिसत आहे. जिल्हा मिळावे घेताना अत्यंत आवश्यक तंबू व ताडपत्रांसाठी संस्थेला दुसऱ्या विभागावर अवलंबून राहावे लागते. तंबूची गरज ओळखून आमदार कृष्णा गजबे यांनी आपल्या आमदार निधीतून 50 तंबू स्काऊट गाईड संस्थेला उपलब्ध करून दिले तर ताडपत्रांची गरज ओळखून लायन्स क्लब गडचिरोली च्या वतीने 15 ताडपत्री संस्थेला मदत म्हणून उपलब्ध करून दिल्यात.
वासाडा येथील कर्मवीर विद्यालयाच्या भव्य पटांगणात आयोजित स्काऊट गाईड मेळाव्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी लायन्स क्लबचे सदस्य डॉ. सुरेश लडके, शांतीलाल सेता, शेषराव येलेकर, स्मिता लडके, संध्या येलेकर यांनी सदर मदत संस्थेचे जिल्हा आयुक्त तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्काऊट गाईड संस्थेला प्रदान केली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या सरपंच रत्नमाला सेलोटे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचीत सावकार पोरेड्डीवार, आरमोरी नगराध्यक्ष पवन नारनवरे, संस्थेचे सचिव रवी जानवर, माजी अध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार , प्राथमिक शिक्षणाधिकारी व्ही.पी. नाकाडे, जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका, स्काऊट गाईड विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...
वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...
*चिमुर क्षेत्रातील सहाही विधान सभेच्या जागा तिसरी आघाडी लढविणार* *आर पी आय च्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत सुर ब्रम्हपुरी:लोखडे* ✍️प्रा....
*चकमकीत४नक्षल्यांना मारण्यात सी-६० कमांडोंना यश* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज गडचिरोली:-अहेरी तालुक्याअंतर्गत...
गडचिरोली - ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे...