वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
अकोला प्रती - अकोला वाहतूक पोलीस कर्मचारी नेहमीच आपल्या कामात कर्तव्य दक्ष असुन चोरीचे वाहन शोधुन काढतात व त्या मालकाच्या स्वाधीन करतात अश्या कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चिकटे यांचा सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे,ॲड.रोशन तायडे, विशाल भोसले यांनी सत्कार केला वाहतूक नियंत्रणाचे काम करणाऱ्या अमंलदार वाहनधारकांना नियमाच्या चौकटीत राहून वाहन चालविण्यास दंड करतात त्यासाठी त्यांना नेहमी सतर्क राहावे लागते या सतर्कते मुळे शहर वाहतूक शाखा अकोला येथे कार्यरत अमलंदार दिलीप हिंगणकर ज्ञानेश्वर चिकटे, सचिन दवंडे यांनी वाहनाची चोरी उघडली सांगली गजबजलेल्या गांधी रोडवरील चांदेकर चौकात कार्यरत असताना दुचाकी एम एच ३० एव्ही 4137 बाबत संशय आला त्यांनी वाहन थांबवून विचारपूस केली वाहनाचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता वाहन चालक जवळ कोणत्याही प्रकारचे आवश्यक कागदपत्र नसल्याचे निदर्शनास आले वाहन चालकास विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उडवा उडविची उत्तर दिली कागदपत्र आणून दाखवतो असे म्हणून वाहन चालक तशीच दुचाकी सोडून निघून गेला परंतु वाहन चालक दुचाकी घेण्यास परत आला नाही वाहन चालक परत न आल्याने पोलीस अमंलदार यांनी गाडी शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला येथे आणून डिटेन केली दुचाकीच्या मूळ मालकाचा शोध लावला ही दुचाकी डॉ.प्रमोद राहुडकर रा अमानवाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांची असल्याबाबत समजले दुचाकीच्या मूळ मालकास मोबाईल वरून संपर्क करून माहिती विचारली असता त्यांनी सदरची दुचाकी त्यांच्या मालकीची असून सन 2016 मध्ये बार्शीटाकडी बायपास इथून चोरीस गेल्याबाबत कळविले दुचाकी चोरी गेल्या बाबत त्यांनी बार्शीटाकली पोलीस स्टेशनला देखील नोंद केली असल्याबाबत कळविले त्यामुळे सर्व सोपस्कार पार पाडून गाडी बार्शीटाकळी पोलीस यांच्या ताब्यात दिली व गाडी मालकाला परत करण्यात आली आतापर्यंत ज्ञानेश्वर चिकटे या वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी एकूण सात दुचाकी मूळ मालकास परत केल्यात तत्कालीन पोलीस निरीक्षक गजानन शेळके व आताचे विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहतूक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत
त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा म्हणून सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे एड. रोशन तायडे सामाजिक कार्यकर्ता विशाल भोसले यांनी नेहरू पार्क चौक स्थित कार्यरत असलेले ज्ञानेश्वर चिकटे या वाहतूक पोलिसांचा सत्कार केला
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...