भारतीय वार्ता :बुलढाणा प्रतिनिधी
दि.३०/८/२०२२ राेजी संभाजी ब्रिगेड च्या बुलढाणा (उत्तर) जिल्हा बैठकीचे आयाेजन नांदुरा येथे करण्यात आले होते,या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष डॉ.गजानन पारधी साहेब हे हाेते तर संभाजी ब्रिगेडचे (बुलढाणा अकोला वाशिम) विभागीय अध्यक्ष गजाननभाऊ भोयर, संभाजी ब्रिगेडचे बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्ष योगेश पाटील व जिल्हा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती हाेती,
यावेळी शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीच्या अनुषंगाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजयसिंग जाधव यांनी या बैठकीला सदिच्छा भेट देऊन आगामी काळात शिवसेना संभाजी ब्रिगेड सोबत सर्व निवडणुकांमध्ये एक दिलाने काम करेल अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांनी दिली.यावेळी संभाजी ब्रिगेड च्या मावळ्यांनी घोषणांच्या निनादात शिवसेना पदाधिकारी यांचे जोरदार स्वागत केले,यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गजानन पारधी अकोला तसेच विभागीय अध्यक्ष गजानन भाऊ भोयर वाशिम यांनी पदाधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले..बैठीकीचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन डॉ.शरद पाटील यांनी केले आभार प्रदर्शन संभाजी मोताळा तालुका अध्यक्ष गणेश शिंदे यांनी केले बैठक यशस्वी करण्यासाठी संभाजी नांदुरा तालुकाध्यक्ष अमर पाटील तसेच तालुक्यातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. तसेच बैठकीला यावेळी खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर व मोताळा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा पदाधिकारी एस.पी.संबारे, शरद पाटील, मंगेश सोळंके, डॉ.सागर महाजन सर्व तालुकाध्यक्ष अमर पाटील, गणेश शिंदे,विठ्ठल अवताडे, रामा रोठे, कृष्णा वडोदे, राहुल वनारे,तालुका पदाधिकारी उपस्थित होते.