वणी येथे बौद्धधम्मीय वर-वधु परिचय मेळाव्याचे आयोजन.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
Reg No. MH-36-0010493
जातीचे खोटे प्रमाणपत्र लावुन महाबीजमध्ये नौकरी बळकावणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांविरुध्द महाबीजने केली बरखास्तीची कारवाई
जातीचे खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमधिल नौकरी मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचेविरुध्द महाबीजने कठोर कारवाई केली आहे. महाबीजच्या प्रशासनाने अशा प्रकारच्या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या एकुण 11 अधिकारी कर्मचारी यांचे विरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयाचे निकालाच्या आधारावर कठोर कारवाई केली आहे.
यामध्ये नागपुर येथिल जिल्हा व्यवस्थापक श्री. गणेश महादेव चिरुटकर, गडेगाव जि. भंडारा येथिल श्री. भिमराव मारोतराव हेडाऊ क. प्र. स, शिवनी अकोला येथिल श्री. एम. एन. गावंडे क.प्र.स., हिंगोली येथिल श्री. राजेंद्र जुनघरे केंद्र व्यवस्थापक, परभणी येथिल श्री. घावट, जालना येथिल अजापसिंग घुसिंगे शिपाई असे एकुण 11 कर्मचारी अधिकारी यांचा समावेश आहे. दि. 03.01.2022 चे कार्यालयीन आदेशाद्वारे महाबीजने खोटे प्रमाणपत्र लावुन नौकरी बळकावणाऱ्या विरुध्द रितसर कारवाई केल्यामुळे महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपुर यांच्या खऱ्या आदिवासांन्या न्याय्य् मिळवुन देण्याच्या प्रयत्नाला यश आले आहे.
वरील प्रमाणे कर्मचारी अधिकारी यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमध्ये नौकरी मिळविली आहे. हि बाब महाबीज प्रशासनाला माहित झाल्यावर महाबीज प्रशासनाने अनेक वर्ष कुठल्याही प्रकारची ठोस अथवा दंडात्मक कारवाई केली नव्हती. परंतु महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटना नागपुर यांचे निवेदन व मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामुळे महाबीज प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले.
श्री. रुचेश जयवंशी (भा.प्र.से. तथा व्यवस्थापकीय संचालक महाबीज अकोला) यांनी दि. 03.01.2022 च्या कार्यालयीन आदेश निर्गमीत करुन कारवाई बाबत महाराष्ट्रातील महाबीजच्या कार्यालयाला प्रत पाठविले आहे. सदरिल रितसर कारवाईमुळे खऱ्या आदिवासी कर्मचारी अधिकाऱ्यांना खोट्या आदिवासींच्या बरखास्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर नौकरी मिळवुन न्याय्य मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
खोट्या जातीच्या प्रमाणपत्राद्वारे महाबीजमध्ये नौकरीत घुसखोरी करुन महाबीजची फसवणुक केल्याप्रकरणी आतापर्यंत घेतलेले सर्व आर्थिक लाभ सदरील कर्मचारी अधिकारी (श्री. चिरुटकर, श्री. जुनघरे, श्री. हेडाऊ ई.) यांचेकडुन व्याजासकट वसुल करण्यात यावे. अशी मागणी जोर धरत आहे. असे प्रेस नोट द्वारे राजेश अंबादास भगत, बी-टेक एल.एल.बी. केंद्र अभियंता व सामाजीक कार्यकर्ता मो. 9975755480 यांनी कळविले आहे.
वणी:- बहुउद्देशीय बौद्धधम्मीय मनोमिलन यांच्या विद्यमाने रविवार दि.२९ डिसेंबर२०२४ ला सकाळी १० वाजता बुद्धविहार...
वणी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा...
वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...
मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...
वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...
**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...
शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...
*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...