*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
वणी (प्रतिनिधी ) : आज शनिवार दिं. १७.७.२०२१ ला दुपारी एक वाजता श्री.संत गाडगेबाबा समाज भवन वणी येथे महाराष्ट्र राज्य वरठी (परीट) धोबी समाज महासंघ सर्व भाषीक वणी तालुक्याचे वतीने वृक्षारोपण व यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामनी, मारेगांव, पांढरकवडा, वणी तालुक्यातील सर्व समाज बांधव महिला भगिनी व कार्यकर्ता समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सर्व प्रथम श्री संत गाडगेबाबा समाज भवन परिसरात डी. डी. सोनटक्के संस्थापक अध्यक्ष यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर श्री. संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी सर्व भैय्याजी रोहणकर जेष्ठ मार्गदर्शक व प्रदेश उपाध्यक्ष, रूकेश मोतीकर राज्य समन्वयक, राजेंद्र मुके राज्य शिक्षण व आरोग्य विभाग प्रमुख, चंद्रशेखर केळतकर यवतमाळ जिल्हाध्यक्ष व प्रकाश क्षिरसागर जेष्ठ मार्गदर्शक यांनी समाज संघटनेचे महत्व आणि कार्यकर्त्यांची कर्तव्ये या विषयाला अनुसरून उपस्थित समाज बांधव/ महिला भगिनी यांना उचीत मार्गदर्शन केले.
महासंघ सर्व भाषीक या संघटनेत हिरीरीने भाग घेऊन समाज संघटनेच्या कार्यात सहभागी होणा-या वणी, झरी-जामनी, मारेगाव, पांढरकवडा इ. तालुक्यातील कार्यकर्त्यांची योग्य त्या पदावर नियुक्ती करून सर्वांना डी.डी. सोनटक्के संस्थापक अध्यक्ष यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
अध्यक्षीय भाषणातून डी. डी. सोनटक्के यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना त्यांचे पदाचे महत्त्व समाजासाठी करावयाचे कार्य, संघटने मुळे समाजाच्या सुटणा-या समस्या, राजकीय व सामाजिक तत्वावर संघटनेचा होणारा प्रभाव इ. विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला वरील तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन राजू तुरानकर विदर्भ महासचिव,दिपलाल चौधरी,प्रदीप मुके,कैलास बोबडे,ज्ञानेश्वर भोंगळे, नितीन बिहारी, जनार्दन थेटे,सतीश दोडके, भास्कर पत्रकार, राजेश क्षीरसागर,कलावती क्षीरसागर, गीता तुरणकर, मीना तुरणकर, प्रतिभा फाले यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू तुरणकर सूत्रसंचालन ज्योती फाले हिने तर शेवटी आभार प्रदर्शन शुभम धानोरकर यांनी केले व सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...