Home / महाराष्ट्र / मराठवाडा / लस घेण ऐच्छिक ; बळजबरी...

महाराष्ट्र    |    मराठवाडा

लस घेण ऐच्छिक ; बळजबरी करू नका अन्यथा देशभर राष्ट्रव्यापी बहिष्कार करू । भारतीय विद्यार्थी मोर्चाचा सरकारला इशारा.

लस घेण ऐच्छिक ; बळजबरी करू नका अन्यथा देशभर राष्ट्रव्यापी बहिष्कार करू । भारतीय विद्यार्थी मोर्चाचा सरकारला इशारा.

नवनाथ रेपे (लातूर-जिल्हा-प्रतिनिधी)  : राज्य सयकारने सर्व नियम सिथिल करत शाळा महाविद्यालये सुरू करण्याचा नियम केला पण सरकारडून व शाळा, महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थांना लसीकरण सक्तीच केल जात आहे, जे विद्यार्थी वँक्सीनचे दोन डोस घेणार नाहीत त्यांना शाळा महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही असा आदेश सरकार व शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक प्राचार्य यांचेकडून काढल्या जात असल्यामुळे संविधानाने जो शिक्षणाचा मुलभूत अधिकार दिला आहे त्याचे हनन होत आहे त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने देशभरातील ५५० जिल्हाधिकारी यांचे मार्फत राज्याच्या मुख्यमत्र्यांना निवेदन दिले गेले तसेच निवेदन लातूर जिल्हाधिकारी यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांना भारतीय विद्यार्थी मोर्चाचे बंडूसिंग भाट यांनी दिले.

राज्य सरकारने शाळा महाविद्यालयात प्रवेश केवळ दोन डोस घेतलेल्यानाच मिळेल अशा प्रकारचे परिपत्रक काढत सक्ती केल्यामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या ह्या निवेदनात म्हटले की, लसीकरण बंधनकारक आहे असे केंद्र सरकार व केद्रींय आरोग्य मंत्रालयाने कुठेही म्हटले नाही तसेच सर्वोच्च न्यायालय व अनेक राज्याच्या न्यायालयाचे आदेश आहेत की, कोवीड १९  लसीकरण बंधनकारक नाही ते जर बंधनकारक करणार असतील तर नागरीकांच्या मुलभूत अधिकाराचे हनन होणार आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चा सुचित करते की, बंधनकारक केलेले लसीकरण तात्काळ रोखा.

तसेच भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या म्हणजे लसीकरण बंधनकारक असल्याचा आदेश दाखवावा किंवा तो भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या मेल आयडीवर पाठवावा. लसीकरण केल्यास कोरोना होणार नाही यांची शाश्वती आहे ? असेल तर सरकारने तसे लिखित स्वरूपात द्यावे. जर लसीकरणामुळे एखाद्या विद्यार्थी मरण पावल्यास त्याची सर्वस्वी जिम्मेदारी सरकारची असेल हे सरकारने लिखित द्यावे.  जे वँक्सीन बंधनकारक केल्या जात आहे त्यात नेमके कुठले घटक आहेत हे सरकारने लिखित द्यावे. त्यामुळे बंधनकारक केलेले हे लसीकरण तात्काळ रद्द करावे व नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे जतन करावे. जर सरकारने हे लसीकरण रद्द केले नाही किंवा आमच्या वरील मागण्या मान्य केल्या नाहीत तर भारतीय विद्यार्थी मोर्चा संपुर्ण देशभर कोवीड १९ च्या लसीकरणाविरोधात राष्ट्रव्यापी बहिष्कार अंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.

सदरील निवेदन लातुरचे जिल्हाधिकारी यांना देताना दत्ता करंजीकर जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी, बडुसिंग भाट जिल्हा सचिव बहुजन मुक्ती पार्टी, प्रकाश लेनेकर, कपील धावड, अभिजित लखमशेट्टे, गंगाराम घोटमुकळे व दै. समिक्षाचे लातूर शहर प्रतिनिधी नवनाथ रेपे हे उपस्थित होते.

ताज्या बातम्या

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब 21 December, 2024

वाढदिवसानिमित्त स्वेटर वाटून गोहोकार यांनी दिली अपंग विद्यार्थ्यांना मायेची उब

वणी:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त अपंग विद्यार्थ्यांना...

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल  मुकुटबन  कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान 21 December, 2024

एमपी बिर्ला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

मुकुटबन :बिरला कॉर्पोरेशन लिमिटेड, युनिट आर सी सी पी एल मुकुटबन कडुन दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या...

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. 20 December, 2024

मनसेचे माजी तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

...

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन 20 December, 2024

वणी येथे श्री संत गाडगेबाबांच्या पावन स्मृतिस अभिवादन

वणी: निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 68 व्या पुण्यतिथी निमित शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर 2024 ला संत गाडगेबाबा...

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक. 19 December, 2024

चंद्रपूर येथे झालेल्या बालनाट्य स्पर्धेत वणीच्या चमुला द्वितीय पारितोषिक.

वणी:- वणी येथील बालकलावंतांनी चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बालनाट्य स्पर्धेत द्वितीय...

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना  न्याय. 18 December, 2024

आ. संजय देरकर यांनी कपासीचे झाड घेवून मागितला शेतकऱ्यांना न्याय.

वणी :- नागपूर येथे राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून सरकारला विविध प्रश्नावर घेतल्या जात आहे. तारीख १८...

मराठवाडातील बातम्या

धनगर समाजाच्या मुलांच्या हातामध्ये एसटीचे प्रमाणपत्र द्या ,अन्यथा धनगर समाज हा राज्य सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीला गेल्याशिवाय राहणार नाय

बीड :दि 19/09/2024 रोजी बीड येथे महाराष्ट्रातील धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या( ST) आरक्षणाची अंमलबजावणी शिंदे...

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला.

निलंगा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी म्हणून संग्राम सुर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला. भारतीय वार्ताजिल्हा...

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* *शहरात विजांचा कडकडाटाचा*

*ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच* शहरात विजांचा कडकडाटाचा ✍️उत्तम माने लातूर लातूर:- शहरासह ग्रामीण...