वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर, दि. 21 डिसेंबर : कोरोना व संभाव्य ओमॉयक्रॉनच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यावर जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली नियमितपणे जिल्हा टास्क फोर्सची बैठक घेण्यात येत असून आतापर्यंत 23 लक्ष 52 हजार 501 डोजद्वारे (पहिला आणि दुसरा मिळून) नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 90.59 टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोज तर 52.70 टक्के लोकांनी दुसरा डोज घेतल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड विषयक व लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, डॉ. मिलिंद सोमकुंवर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, पहिला डोज घेतल्यानंतर ज्या नागरिकांचा दुस-या डोजचा कालावधी झाला आहे, त्यांचे लसीकरण त्वरीत करण्यावर आरोग्य यंत्रणेने भर द्यावा. जेथे पहिला डोज घेणा-यांची टक्केवारी अतिशय चांगली आहे, मात्र दुसरा डोज घेण्यात उदासीनता दिसून येते, तेथे लक्ष केंद्रीत करा. तसेच ज्यांचा पहिला डोज द्यावयाचा आहे, त्यांना कोव्हॅक्सीन देण्याचे नियोजन करा. जेणेकरून 28 दिवसांच्या कालावधीनंतर लगेच दुसरा डोज देता येईल. त्यासाठी कोव्हॅक्सीनची मागणी वाढवा. दुस-या डोजच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांचे लसीकरण करून घ्या. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर जबाबदारी सोपवून त्यांना लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवू द्यावे, अशाही सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण 16 लक्ष 41 हजार 830 पात्र लाभार्थी असून यापैकी 14 लक्ष 87 हजार 292 जणांनी पहिला डोज घेतला आहे. ही टक्केवारी 90.59 आहे. तर 8 लक्ष 65 हजार 209 जणांनी दुसरा डोज घेतला असून ही टक्केवारी 52.70 आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...