Home / चंद्रपूर - जिल्हा / लसीकरण जनजागृती मोहिमेचा...

चंद्रपूर - जिल्हा

लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ..

लसीकरण जनजागृती मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ..

हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ रवाना

उमेश तपासे (चंद्रपूर-जिल्हा -प्रतिनिधी) : कोरोनाविरुध्दच्या लढाईत ‘कोव्हीड – 19 प्रतिबंधात्मक लस’ हे एक प्रभावी शस्त्र आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य दिले असून लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, कोविड-19 लसीकरणाबाबत जनतेमध्ये असलेले गैरसमज दूर करून जनजागृती व प्रबोधन करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी संबंधित तालुकास्तरीय, ग्रामस्तरीय समित्यांनी सक्रीय व्हावे. स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच लसीकरण झालेल्या मान्यवरांची मदत घेऊन इतरांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. नागरिकांनीही लसीकरणाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून लसीकरण जनजागृती पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान चित्ररथ, पोस्टर्स, स्टीकरशीट, जिंगल्स, हँडबील आदींच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. लसीकरणबाबत असा आहे जनजागृतीपर संदेश : कोव्हीड – 19 लस ऑनलाईन नोंदणी पध्दतीने तसेच ‘ऑन दी स्पॉट’ उपलब्ध्, 18 वर्षांवरील सर्वांना शासकीय लसीकरण केंद्रात मोफत लस, स्तनदा मातासुध्दा लस घेण्यासाठी पात्र, मासिक पाळी असली तरी लस घेता येते, उच्च रक्तदाब, किडणीचे आजार, मधूमेह, कॅन्सर व सहव्याधी असणा-यांनी प्राधान्याने लस घ्यावी, कोव्हीडमधून पूर्णपणे बरे झालेल्या व्यक्ती तीन महिन्यांनी लस घेण्यासाठी पात्र, लस घेतल्यानंतर 15 दिवसांनी रक्तदानसुध्दा करता येते, ‘लसीकरणानंतर दोन वर्षांनी मृत्यु’ ही निव्वळ अफवा, ‘लसीकरणामुळे अपत्य प्राप्ती होत नाही’, ही सुध्दा अफवाच. कोणत्याही प्रकारचे वंधत्व येत नाही, कोव्हीड – 19 लस पूर्णपणे सुरक्षित आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, लस घेतल्यानंतर ताप येणे, अंगदुखी होणे, ही एक नैसर्गिक प्रकिया. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा एक भाग. त्यामुळे घाबरू नका, लसीकरणानंतर नियमित मास्कचा वापर, साबणाने हात स्वच्छ धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखणे आदी नियमांचे पालन आवश्यक.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...