Home / महाराष्ट्र / मार्डी येथे दारू दुकानावर...

महाराष्ट्र

मार्डी येथे दारू दुकानावर धाड ४० लाखापर्यंत  देशी  दारू जप्त 

मार्डी येथे दारू दुकानावर धाड ४० लाखापर्यंत   देशी  दारू जप्त 

एस पी पथकाची कार्यवाही ७ आरोपीना  अटक 

वणी:  कोरोना काळात विदेशी दारु विक्री करणा-या मार्डी येथील दारु दुकानावर पोलिस अधिक्षक  यवतमाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितिच्या आधारे बुधवारी१४ एप्रिल रोजी रात्री ७-३० वाजतेच्या दरम्यान धाड  टाकुन ४० लाख ६० हजार रुपयाची देशी-विदेशी दारु सह ३ लाख ४० हजार रुपयाची रोख जप्त करीत सात आरोपींना अटक केली आहे. ही कार्यवाही ८ते ९ तास चालली.

          कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये जिल्हात दारू विक्री बंदचे आदेश असताना  मार्डी येथे अवैध पणे दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना मिळाली असता  त्यांनी  सायबर सेल व एलसीबीच्या पथकाना सूचना देऊन १४ एप्रिलच्या रात्री ९ वाजता दरम्यान तालुक्यातील मार्डी येथील जयस्वाल यांच्या मालकीच्या देशी विदेशी दारू दुकानावर धाड टाकली. या धाडीत बंदच्या काळात दारू दुकान सुरु असल्याचे दिसून आले या धाडीत ४० लाख ६० हजार रुपयाची देशी विदेशी दारू जप्त केली.तर तपासात तीन लाख ४० हजार रोख जप्त करण्यात आले. 
           
ही दारु विक्रीची आतापर्यंतची जिल्हा पोलीस दलाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. लॉक डाऊन च्या तोंडावर ही कार्यवाही झाल्याने तालुक्यात दारू तस्करी करनारे धास्तावले आहे  
या कारवाईत आरोपी वेदांत जयस्वाल (१९) रा.मार्डी, वैभव रस्से (२१)रा.पिसगाव, अविनाश नगराळे (२८)रा.गोंडबूरांडा,मंगेश अडसकर (२१)रा.पिसगाव,अविनाश पाटील (२६) रा.मार्डी, मुकेश कांबळे (३५)रा.मार्डी, व एक विधी संघर्ष बालक असे सात आरोपीना अटक केली आहे.

     या आरोपीवर महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत व कोविड -१९ च्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस निरिक्षक प्रदीप परदेशी यांचे मार्गदर्शनात सायबर सेल व एलसीबी पथकाचे पो.नि.किशोर जुंनघरे,स.पो.नि.अमोल पुरी,पोउपनी.योगेश रंधे,पो.ना.कविष पालेकर,बबलू चव्हाण,उमेश पिसाळकर,पंकज पातूरकर, पो.कॉ. सुधीर पिदूरकर,सलमान शेख,शहजाद शेख यांनी केली.असेच दारू विक्रीचे सूत्र इतर ठिकाणी सुरु असल्याचे चोरटया आवाजात बोलें जात आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...