Home / महाराष्ट्र / मानकी येथे सरपंच पदी...

महाराष्ट्र

मानकी येथे सरपंच पदी कैलास पिपराडे, उपसरपंच पदी शंकर माहुरे यांची अविरोध निवड..

मानकी येथे सरपंच पदी कैलास पिपराडे, उपसरपंच पदी शंकर माहुरे यांची अविरोध निवड..

वणी:  एकीकडे देशासह राज्यात कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या पक्षांत एकमेकांच्या विरोधात सुडाचे राजकारण सुरू असतांना मात्र मानकी येथे ह्या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपण तिन्ही भाऊ भाऊ, गावाच्या विकासासाठी एकत्र येऊ म्हणत सरपंच, उपसरपंच पदाची निवड अविरोध झाली आहे. मानकी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच  सरपंच पदी भाजपाचे तालुका सरचिटणीस कैलास पिपराडे व  उपसरपंच पदी कॉंग्रेसचे शंकर माहुरे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.
    तालुक्यातील माणकी येथे भाजप, शिवसेना व कॉंग्रेस या तीन पक्षांचे स्वतंत्र गट आहेत. त्यामुळे आता सरपंच, उपसरपंच कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना समर्थित भाजपाचे चार व कॉंग्रेसचे तीन सदस्य असल्याने चार सदस्य असलेल्या भाजपाचेच सरपंच, उपसरपंच होणार असे चित्र असतांना मात्र कॉंग्रेसला उपसरपंच पद देऊन दिलेला शब्द पाळण्यात आला आहे. कारण ग्रामपंचायत निवडणूकीपुर्वी भाजप, शिवसेना व कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाचा सरपंच तर काॅंग्रेसचा उपसरपंच असे समीकरण जुळवून आणले होते. त्यानुसार शिवसेना समर्थित भाजपाच्या सदस्यांनी कॉंग्रेसला उपसरपंच पद देऊन आपला शब्द पाळला आहे. विशेष म्हणजे राजकारणात दिलेल्या शब्दाला किंमत राहत नाही. परंतु मानकी येथे भाजप, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, सदस्यांनी राजकारण न करता गाव- विकासासाठी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक अविरोध केली आहे. त्यामुळे आता गाव विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणार आहेत.
      सरपंच पदी कैलास पिपराडे, उपसरपंच पदी शंकर माहुरे तर सदस्या म्हणून नानाजी पारखी,  इंदिरा परशुराम पोटे, वंदना कैलास पिपराडे, सुनिता सुनिल कुत्तरमारे,नलीनी मिलमिले या सदस्यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...