आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
राजुरा (प्रतिनिधी) : तालुक्यात छुप्या मार्गाने अवैद्य रेतीची सुरु असलेली वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभाग सातत्याने प्रयत्न करित आहे मात्र जागोजागी असलेले रेती तस्करांचे गुप्तहेर रेती तस्करांना माहिती पुरवीत असल्यामुळे कारवाहीत अडचण निर्माण होत आहे. असे असले तरी (दि.२) रात्री तहसीलदार हरीश गाडे व नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, विनोद डोनगावकर स्वतः पथकात सामील होत सोंडो गावाजवळ एम एच ३४ ए व्ही २३५३ क्रमांकाचा विना परवाना रेती वाहतूक करणारा हायवा जप्त केला.
एरव्ही महसूलचे गौण खनिज पथक कारवाहीला जाणार असल्याची माहिती तहसिल कार्याबाहेर असलेल्या मुखबीरांना माहीत होत असल्याने रेती तस्करांपर्यंत पथक पोहचण्यापूर्वीच तस्कर पसार होत असतात यामुळे कारवाही करताना अडचणी निर्माण होत आहे, असे असताना स्वतः तहसीलदार गाडे आपल्या नायब तहसीलदारासह गुप्तहेरांना चकवा देत रेती तस्करांवर कारवाहीसाठी गेले असता सोंडो गावाजवळ विना परवाना चार ब्रास रेती वाहतूक करणारा हायवा रात्रीच्या सुमारास दिसला असता त्याला थांबवून चौकशी केली असता विना परवाना चार ब्रास रेती वाहतूक करीत असल्याचे दिसून आल्याने हायवा जप्त करण्यात आला. यावेळी चालक ईश्वर भोयर यांना विचारणा केली असता सदर हायवा जिवती येथील राठोड यांचा सल्याचे सांगितले. यावेळी सदर वाहनावर २ लाख ४४ हजार चारशे रुपये दंड आकारला असून प्रत्यक्ष तहसीलदारांच्या कारवाहीमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.
इन्फो :
महसुलचा कणा समजल्या जाणाऱ्या तलाठ्यांना व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या गावातील कोतवालांना गौण खनिज तस्करांची संपूर्ण माहिती असताना कारवाही का होत नाही, यासंबंधी सर्व सामान्य नागरीकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. याचबरोबर छोट्या छोट्या वाहनांवर कारवाही करणारे पोलीस रात्रीच्या गस्तीमध्ये गौण खनिज तस्करांना मोकाट का सोडत आहे, गावात असलेला पोलीस पाटील लहान सहान खबर पोलीस स्टेशनला देणारा, गावातून गावातून गौण खनिजाची तस्करी करीत असताना गप्प का यासह अनेक प्रश्न सर्व सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. प्रत्येक ठिकाणी स्वतः तहसीलदार यांनीच कारवाही करणे शक्य नसून गौण खनिज तस्करांवर अंकुश ठेवण्यासाठी गावपातळीवरील पोलीस पाटील, कोतवाल, पोलीस कर्मचारीसह महासुलच्या कर्मचाऱ्यांचे काम आहे. यासर्वांच्या सहकार्याने गौण खनिज तस्करांवर आळा घालता येईल.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
*अभिजीत धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम* ✍️दिनेश झाडे राजुरा राजुरा:-- इन्फंट जीजस सोसायटी...
*इन्फंट च्या विद्यार्थ्यांची बँक आणि कोळसा खाणीला भेट : क्षेत्र भेटीतून घेतले व्यवहारीक शिक्षण* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
*इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा...