Home / चंद्रपूर - जिल्हा / घुग्गुस शहरात असलेले...

चंद्रपूर - जिल्हा

घुग्गुस शहरात असलेले अनाधिकृत होल्डिंग्स, बॅनर नगरपरिषदेने हटविले, मुख्याधिकाऱ्यांची कारवाई..!

घुग्गुस शहरात असलेले अनाधिकृत होल्डिंग्स, बॅनर नगरपरिषदेने हटविले, मुख्याधिकाऱ्यांची कारवाई..!

घुग्गुस (प्रतिनिधी): घुग्गुस शहरात लागून असलेले  अनाधिकृत होल्डिंग्स,बॅनर आज नगर परिषदेच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षांना शहरात बॅनर लावायचे असल्यास नगर परिषदेची परवानगी घेऊनच बॅनर लावावे अशी विनंती मुख्याधिकार्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षांत अनधिकृत फलकांचे शहर म्हणून घुग्गुस शहर ओळखला जात आहे, या अनधिकृत फलकांनी केवळ शहराचे विद्रुपीकरण झाले असे नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचेही प्रश्न निर्माण केले आहेत.तसेच नगर परिषदेचा कर सुद्धा मोठ्या प्रमाणात बुडत आहे.

सत्ताधारी व विरोधी अशा सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये फलक उभारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. परिणामी, शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्ते व चौक अनधिकृत फलकांच्या जंजाळात सापडले आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळे येण्याबरोबर अपघातही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं आज नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी आर्शिया जुही यांच्या नेतृत्वात संवर्ग विकास अधिकारी संदीप वानखेडे, विक्रम क्षीरसागर, शंकर पचारे,संदीप मत्ते,रवींद्र गोहोकार आदी कर्मचाऱ्यांनी शहरात लागलेले बॅनर होल्डिंग्स काढले आहे. तसेच शहरात फलक बॅनर लावायचे असल्यास नगर परिषदेची परवानगी घ्यावी अशी ताकीद देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन. 28 January, 2025

भिमकन्या कडुबाई खरात यांचा बुद्ध व भिम गितांच्या कार्यक्रमाचे आयोजन.

वणी:- त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच च्या वतीने महाराष्ट्राची...

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट. 28 January, 2025

सलग दुस-या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू, संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट.

वणी -वेकोलिसाठी काम करणा-या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढण्यात आले....

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा. 28 January, 2025

भारतीय गणतंत्र दिन सोहळा उत्साहात साजरा.

वणी:-- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ 26 जानेवारी भारतीय गणतंत्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक. 28 January, 2025

आंतर शालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थांना तृतीय पारितोषिक.

वणी - श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज वणी मधील विद्यार्थ्यांनी...

*जिल्हा परीषद शाळा  शिवणी (जहाँ)येथे  76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या  उत्साहात  संपन्न* 28 January, 2025

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न*

*जिल्हा परीषद शाळा शिवणी (जहाँ)येथे 76 वा प्रजासत्ताक दीन व वार्षीक स्नेहसंम्मेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न* ✍️राजू...

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे. 27 January, 2025

प्रेस वेलफेअरचा करंडक सलग तिसऱ्यांदा स्वर्णलीलाकडे.

वणी:- प्रेस वेल‌फेअर असोशिएशन द्वारा आयोजीत आंतर शालेय समुह नृत्य स्पर्धेचा करंडक यावर्षी स्वर्णलीला इंटरनैशनल स्कुलने...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...