श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
144 पॉझेटिव्ह, 289 कोरोनामुक्त, 4 मृत्यु जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1758 बेड उपलब्ध
वणी(यवतमाळ) दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 144 जण पॉझेटिव्ह तर 289 जण कोरोनामुक्त झाले असून चार जणांचा मृत्यु झाला. यातील दोन मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 5296 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 144 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5152 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2261 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1064 तर गृह विलगीकरणात 1197 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71426 झाली आहे. 24 तासात 289 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 67420 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1745 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 2 हजार 463 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 29 हजार 742 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.86 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.72 आहे तर मृत्युदर 2.44 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये बाभुळगाव तालुक्यातील 61 वर्षीय महिला व 72 वर्षीय पुरूष तर खाजगी रुग्णालयात महागाव तालुक्यातील 52 वर्षीय पुरूष , तर पुसद तालुक्यातील 58 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.
गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 144 जणांमध्ये 92 पुरुष आणि 52 महिला आहेत. यात आर्णी येथील 5, बाभुळगाव येथील 7, दारव्हा येथील 19, दिग्रस येथील 20, घाटंजी येथील 4, कळंब येथील 2, महागाव येथील 1, मारेगाव येथील 4, नेर येथील 6, पांढरकवडा 1, पुसद येथील 17, राळेगाव 1, उमरखेड 4, वणी येथील 22, यवतमाळ 29, झरीजामणी 1 आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1758 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 521 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1758 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 137 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 440 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 129 रुग्णांसाठी उपयोगात, 397 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 255 उपयोगात तर 921 बेड शिल्लक आहेत.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...