वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
देवानंद ठाकरे (घुग्घुस प्रतिनिधि): घुग्घुस येथील सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळातर्फे व ग्रामस्थांच्या सहयोगाने वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 53 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार 31 डिसेंबर रोजी सामुदायिक ध्यान प्रार्थना मंदिर, श्रीराम वार्ड क्र. 2 घुग्घुस येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, गुरुदेव सेवा मंडळाचे मधुकर मालेकर, नारायण ठेंगणे, संजय भोंगळे, पुंडलिक खनके उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले तसेच प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पहाटे 5 वाजता घटस्थापना बालाजी धोबे यांच्या हस्ते, 5:30 वाजता ध्यानपाठ, प्रबोधन पांडुरंग जुनारकर महाराज यांचे, 8 वाजता रामधून शहरातील प्रमुख मार्गाने, सकाळी 10 वाजता भजन संध्या, शहरातील भजन मंडळाचे, दुपारी 2 वाजता ह.भ.प.श्री. काशीनाथ क्षीरसागर व रमाकांत मांढरे आणि संच यांचे काल्याचे किर्तन, सायंकाळी 4:58 वाजता मौन श्रद्धांजली, सायंकाळी 5 वाजता सामुदायीक प्रार्थना प्रबोधन ग्राम गिताचार्य श्री. राजुजी भोंगळे नवेगाव असे विविध कार्यक्रम घेण्यात आले व प्रसाद वाटप करण्यात आला. आभार व समारोप कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे नीलकंठ नांदे, विठोबा बोबडे, बालाजी धोबे, पंढरी कातरकर, शांताराम पिंपळकर, शेखर तंगलपेल्ली, रंजना कामटकर, छाया मालेकर, छब्बू कातरकर, ताराबाई बोबडे, ममता श्रीवास्कर, ताराबाई देवतळे, विजया बंडेवार, संध्या जगताप, जनाबाई निमकर, अनुसया चिडे, चांदा गेडाम व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...