खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी: विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक आणि अलीकडेच स्थापन केलेल्या जय विदर्भ पार्टीचे संस्थापक, शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष राम नेवले यांचे मंगळवारी (ता.१६) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.यांचा निधनाने सर्व विदर्भात श्रद्धांजली कार्यक्रम आजोजीत केले जात आहे काल दि.22 ला वणी येथील येथिल विदर्भवादी जेष्ठ नेते रफिक रंगरेज यांच्या राहत्या घरी वणी परिसरातील विदर्भवादी मंडळींनी स्व.राम नेवले यांना श्रद्धांजली वाहिली
दि. ८ ऑक्टोबर १९५१ रोजी नागपूर जिल्ह्यातील नरखेड येथे त्यांचा जन्म झाला. शेतकऱ्यांवरील अन्याय तसेच कृषी मालाला दाम मिळत नसल्याने ते शरद जोशी शेतकरी संघटनेकडे आकृष्ट झाले. तेव्हापासून त्यांनी स्वतःला आयुष्यभर सामाजिक कार्यात झोकून दिले. शेतकरी संघटनेचे ते प्रदेशाध्यक्ष होते. विदर्भ व विदर्भातील शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. पश्चिम महाराष्ट्रातील नेते आणि सरकार सातत्याने विदर्भ व विदर्भातील शेतकरी यांच्यावर अन्याय करीत असल्याने त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीत उडी घेतली. गेल्या २० वर्षांपासून ते स्वतंत्र विदर्भासाठीच्या आंदोलनात सक्रिय होते. या दरम्यान त्यांनी अनेक नेत्यांच्या घरांना घेराव घातला. घंटानाद केला. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी विदर्भातील पुढाऱ्यांवर चांगलाच दबाव निर्माण केला होता.
.राज्यात आणि केंद्रात सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भाची निर्मिती केली जाईल असे शपथपत्र त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लिहून घेतले होते. वारंवार पत्र पाठवून त्यांनी दोन्ही नेत्यांना शपथपत्राचे स्मरणही करून दिले. मात्र, पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या आंदोलनाची भाजपच सरकारने दखल घेतली नसल्याने ते व्यथित झाले होते. त्यांनी अलीकडे जय विदर्भ पार्टीची स्थापना केली होती. आगामी महापालिका निवडणूक लढण्याचा इरादाही त्यांनी व्यक्त केला होता. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे, यासाठी शेतकरी संघटनेचे नेते व कार्यकर्त्यांनी सरकारने लावलेली बंदी झुगारून एचटीबीटी बियाण्याची लागवड केली होती. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
स्व.राम नेवले यांना श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रा पाटील सर, रफिक रंगरेज,राजू पिंपळकर,बाळासाहेब राजूरकर,पुंडलिक पथाडे, अनिल गोवारदिपे, व्ही पी टोंगे, मोहितकर साहेब,सिद्धार्थ ताकसांडे, अलका मोवाडे,सुषमा मोडक, कलावती क्षीरसागर,यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...